Yashwant vidyalaya beed

  • Home
  • Yashwant vidyalaya beed

Yashwant vidyalaya beed yashwant vidyalaya beed is established by shri Govindrao wagh for better society,motto of school is Knowledge is power.near about 800 students learn here

08/01/2025
यशवंत विद्यालयात वसंतराव नाईक यांची जयंती कृषी दिन म्हणून साजरी बीड दिनांक (1)शहरातील यशवंत विद्यालय या शाळेमध्ये महाराष...
01/07/2024

यशवंत विद्यालयात वसंतराव नाईक यांची जयंती कृषी दिन म्हणून साजरी

बीड दिनांक (1)शहरातील यशवंत विद्यालय या शाळेमध्ये महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री व हरितक्रांतीचे जनक स्व. वसंतराव नाईक यांचे जयंती कृषी दिन म्हणून साजरी करण्यात आली. यावेळी झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक गणेश वाघ तर प्रमुख पाहुण्यामुळे श्रेष्ठ शिक्षक गाडेकर के.बी. उपस्थित होते. अक्षरा घोडके, नंदिनी शिंदे, स्वप्निल तांगडे, तनया बांडे, संदेश आखाडे, धनश्री मस्के या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष गणेश वाघ यांनी सांगितले की वसंतराव नाईक यांनी शेतीमध्ये मूलभूत बदल केला व परंपरागत शेती न करता आधुनिक पद्धतीने शेती करण्यावर भर दिला. शेतीविषयक त्यांचा दृष्टिकोन फार मोठा होता. औद्योगीकरणामुळे बरेच बदल झाले त्यामुळे वसंतराव नाईक यांनी शेतकऱ्यांना पूरक व्यवसाय करण्यासाठी प्रोत्साहित केले. तसेच आर्थिक मदत केली. अन्नधान्याच्या बाबतीत महाराष्ट्र राज्य वसंतराव नाईक यांच्या कार्यकाळामध्ये स्वयंपूर्ण झाले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महाभारत शाळेच्या शिक्षिका लांडगे एम. बी. यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

शैशनिक वर्ष २०२४ २५ सुरू
29/06/2024

शैशनिक वर्ष २०२४ २५ सुरू

यशवंत विद्यालयात राजश्री शाहू महाराज यांची जयंती उत्साहात साजरी बीड दिनांक( 26) रोजी शहरातील यशवंत विद्यालय या शाळेत भार...
29/06/2024

यशवंत विद्यालयात राजश्री शाहू महाराज यांची जयंती उत्साहात साजरी

बीड दिनांक( 26) रोजी शहरातील यशवंत विद्यालय या शाळेत भारतीय आरक्षणाचे जनक छत्रपती राजश्री शाहू महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक गणेश वाघ तर प्रमुख पाहुणे म्हणून जेष्ठ शिक्षक गाडेकर के. बी. हे उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष गणेश वाघ यांनी छत्रपती राजश्री शाहू महाराज यांच्या जीवनावर प्रकाश टाकताना सांगितले की शाहू महाराजांनी शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रामध्ये भरीव योगदान दिले आहे. त्यावेळी पाण्याचे महत्व त्यांनी जाणून कोल्हापुरी बंधाऱ्यांची निर्मिती केली. तसेच दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची समान संधी मिळावीम्हणून सर्वात प्रथम आपल्या संस्थानांमध्ये आरक्षणाची सुरुवात केली. प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत केले .यावेळी शाळेच्या शिक्षिका श्रीमती लांडगे एम.बी. यांनीही आपले विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेचे शिक्षक मुळे ए.टी.यांनी तर आभार प्रदर्शन शेळके एम.बी. यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

यशवंत विद्यालयात दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारोह संपन्न बीड दिनांक (18 )शहरातील यशवंत विद्यालय या शाळेमध्...
29/06/2024

यशवंत विद्यालयात दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारोह संपन्न

बीड दिनांक (18 )शहरातील यशवंत विद्यालय या शाळेमध्ये माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा मार्च 2024 मध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ नुकताच संपन्न झाला. यावेळी झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक गणेश वाघ तर प्रमुख पाहुणे म्हणून कर सल्लागार आदेशजी नहार व पालक प्रतिनिधी श्रीमान वटारे हे उपस्थित होते. यावेळी आदेश नहार यांनी करियर मार्गदर्शन करताना कला विज्ञान व वाणिज्य शाखेमध्ये ज्या संधी आहेत त्याबद्दल सविस्तर माहिती दिली. त्याचप्रमाणे वाणिज्य शाखेमध्ये करिअरच्या अनेक संधी असल्याचेही त्यांनी सांगितले. विविध उदाहरणे व बोधकथांद्वारे त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी शाळेतून प्रथम क्रमांक वटारे संस्कार सतीश, द्वितीय क्रमांक ढवळे अमर भाऊसाहेब, तृतीय क्रमांक जाधव गौरव सखाराम व जाधव सक्षम विलास त्याचप्रमाणे गोलांडे महेश अशोक, महानवर अर्जुन संतोष, पांढरे रोहित यांचाही सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेचे शिक्षक गीते एस. जी. प्रस्ताविक शाळेचे शिक्षक गाडेकर के. बी. व आभार कार्यक्रमाचे अध्यक्ष गणेश वाघ यांनी व्यक्त केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

आज प्राथमिक उपशिक्षणाधिकारी श्रीमती बोराडे मॅडम यांनी आज शाळेला सरप्राईज भेट दिली याप्रसंगी त्यानी विद्यार्यांशी सवाद सा...
29/06/2024

आज प्राथमिक उपशिक्षणाधिकारी श्रीमती बोराडे मॅडम यांनी आज शाळेला सरप्राईज भेट दिली याप्रसंगी त्यानी विद्यार्यांशी सवाद साधला
शिक्षकांचं काम चांगले आणि समाधानकारक असल्याचं सांगितले

आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा २०२४
29/06/2024

आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा २०२४

यशवंत माध्यमिक विद्यालय बीड  10 वीचा निकाल 100% टक्केशिवनेरी शिक्षण प्रसारक मंडळ बीड संचलित यशवंत माध्यमिक विद्यालय बीड ...
27/05/2024

यशवंत माध्यमिक विद्यालय बीड 10 वीचा निकाल 100% टक्के

शिवनेरी शिक्षण प्रसारक मंडळ बीड संचलित यशवंत माध्यमिक विद्यालय बीड या शाळेचा माध्यमिक शाळांत प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल 100 टक्के लागला असून एकूण 134 विद्यार्थी परीक्षेमध्ये प्रविष्ट झाले होते त्यापैकी विशेष प्राविण्यासह 98 प्रथम श्रेणीत 25 द्वितीय श्रेणीत 10 आणि एक विद्यार्थी तृतीय श्रेणीत उत्तीर्ण झालेले विद्यार्थ्यापैकी 90% पेक्षा अधिक गुण संपादित करणाऱ्यांमध्ये 18 विद्यार्थी आहेत चिरंजीव वठारे संस्कार संतोष 96.40% गुण सर्वप्रथम सर्व द्वितीय चि ढवळे अमर भाऊसाहेब 94 % गुण व चि जाधव सक्षम विलास 94% गुण सर्व तृतीय चि जाधव गौरव सखाराम 93.60% चि गीते प्रणव प्रकाश 93.40% चि गोलांडे महेश अशोक 90.40% कु. तावरे अंजली बाळू ९०.२० % कु. वीर आदिती रामप्रसाद 91.80% चि. भुमरे ऋषिकेश अंगद 90.20% चि. महानवर अर्जुन संतोष 92.20% चि इंदुरे आदित्य अशोक 91% चि इंगोले श्रीतेज संभाजी 92.60 % चि जुळे वैभव कैलास 90.60% चि मुंडे यशराज जालिंदर 90.60% चि नागरगोजे सौरभ हरिपाल 91.20% चि निर्धार विवेक गोकुळ 92.20% चि पवार ऋषिकेश श्रीराम 90.80% चि यादव किशोर सचिन 91 % संपादित केले आहे या यशाबद्दल संस्थेच्या अध्यक्षा सौ सुधामती वाघ सचिव श्री गोविंदरावजी वाघ शाळेचे मुख्याध्यापक श्री गणेश वाघ प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक श्री मधुकर धुमाळ सर तसेच यशवंत विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले आहे

Our school Building (proposed )
16/05/2024

Our school Building (proposed )

विस्तारित शाळेची इमारत Work in Progress
28/04/2024

विस्तारित शाळेची इमारत
Work in Progress

यशवंत विद्यालय बीड या शाळेच्या विस्तारित इमारतीचे भूमिपूजन संपन्न
09/04/2024

यशवंत विद्यालय बीड या शाळेच्या विस्तारित इमारतीचे भूमिपूजन संपन्न

Address

Yashwantnagar Canol Road Beed

431122

Alerts

Be the first to know and let us send you an email when Yashwant vidyalaya beed posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Yashwant vidyalaya beed:

Shortcuts

  • Want your school to be the top-listed School/college?

Share