Janhit Pratishathan Vidyaylay

Janhit Pratishathan Vidyaylay Panchkoshadharit Gurukul

"जनहित प्रतिष्ठानचे प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात" १ मे महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजारोहणाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झ...
01/05/2026

"जनहित प्रतिष्ठानचे प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात" १ मे महाराष्ट्र दिनानिमित्त
ध्वजारोहणाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.

जनहित प्रतिष्ठानच्या प्राथमिक विद्यालयात जनहित प्रज्ञाशोध परीक्षा या नावाने घेतल्या जाणाऱ्या स्पर्धेचे बक्षीस वितरण आज र...
28/03/2026

जनहित प्रतिष्ठानच्या प्राथमिक विद्यालयात जनहित प्रज्ञाशोध परीक्षा या नावाने घेतल्या जाणाऱ्या स्पर्धेचे बक्षीस वितरण आज रोजी संपन्न झाले. सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक देऊन प्रमुख पाहुणे व संस्थेच्या मान्यवर संचालकांच्या हस्ते विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले.
सदर कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मा. उत्कर्षा माणिक खेडकर (मंडल कृषी अधिकारी, महाराष्ट्र शासन) या उपस्थित होत्या त्यांनी विदयार्थ्यांना स्पर्धा परीक्षेचे महत्त्व सांगितले. विशेष म्हणजे प्रमुख पाहुणे विद्यालयाची माजी विद्यार्थिनी असून स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातूनच शासकीय कृषी सेवेत नियुक्त झालेली आहे. तसेच प्रमुख अतिथी म्हणून मा.सौ. शिवानीताई अभिजीत देवकाते (जिल्हा परिषद सदस्य, पुणे) यांनी त्यांच्या मनोगतात बक्षीस पात्र विद्यार्थ्यांचे कौतुक करून भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. संस्थेचे उपाध्यक्ष (गुरुकुल) मा. श्री. प्रा. हृषिकेश घारे (सर) यांनी विद्यार्थी व पालक यांचे अभिनंदन करून नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाबाबत माहिती दिली.
या सर्व विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. किशोर कानिटकर, कार्याध्यक्ष समन्वयक मा. श्री. किशोर शिवरकर, उपाध्यक्ष (प्राथमिक) मा.श्री. किरण शहा (वाडीकर), उपाध्यक्ष (गुरुकुल) मा.श्री.प्रा. हृषीकेश घारे (सर), सचिव मा.श्री.प्रा. सतीश गायकवाड (सर), खजिनदार मा. श्री. सतीश धोकटे व सर्व संचालक मंडळ तसेच आचार्य श्री. हनुमंत दुधाळ, मुख्याध्यापक श्री. अतुल कुटे, बालभवन प्रमुख श्री. निलेश भोंडवे, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व पालक सर्वांनी कौतुक केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सौ. भाग्यश्री ननवरे तर आभार कु. श्रध्दा कडाळे यांनी मानले.

होळी हा फाल्गुन पौर्णिमेला साजरा केला जाणारा रंगांचा, प्रेमाचा आणि वाईटावर चांगल्याच्या विजयाचा लोकप्रिय सण आहे. याला 'ह...
03/03/2026

होळी हा फाल्गुन पौर्णिमेला साजरा केला जाणारा रंगांचा, प्रेमाचा आणि वाईटावर चांगल्याच्या विजयाचा लोकप्रिय सण आहे. याला 'हुताशनी महोत्सव' असेही म्हणतात. होळीच्या पूर्वसंध्येला 'होलिका दहन' (वाईटाचा नाश) आणि दुसऱ्या दिवशी रंगांची उधळण (धुलिवंदन) केली जाते, जी वसंत ऋतूचे स्वागत करते.

28/02/2026
प्रखर राष्ट्रभक्तीचा मंत्र देणाऱ्या, अथांग सागरालाही आपल्या साहसाने थक्क करणाऱ्या स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर या...
26/02/2026

प्रखर राष्ट्रभक्तीचा मंत्र देणाऱ्या,
अथांग सागरालाही आपल्या साहसाने थक्क करणाऱ्या
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त कोटी कोटी प्रणाम!

23/02/2026

दरवर्षीप्रमाणे या वर्षी जनहित प्रतिष्ठानच्या प्राथमिक व माध्यमिक विद्यालयाने शनिवार दि. १४ फेब्रुवारी २०२६ रोजी वर्गवार सायकल सहलींचे नियोजन केले. इ. ७ वी. (राणी लक्ष्मीबाई) या वर्गातील विद्यार्थ्यांनी एकापाठोपाठ सायकल चालवत प्रवासाचा आनंद लुटत कष्टाने, धाडसाने व जिद्दीने बारामती – काझड - बारामती असे ५० कि.मी. अंतर पूर्ण केले.

जनहित प्रतिष्ठानचे प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात गुरुवार दि. १९ फेब्रुवारी २०२६ रोजी शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आल...
19/02/2026

जनहित प्रतिष्ठानचे प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात गुरुवार दि. १९ फेब्रुवारी २०२६ रोजी शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. सदर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्रा.मा. श्री. मानाजी मारुती गावडे (निवृत्त प्राध्यापक टी.सी. कॉलेज, बारामती) होते. त्यांनी छत्रपती शिवरायांचा जीवनपट व कार्य-कर्तृत्व विद्यार्थ्यांसमोर उलगडून सांगितले. शिवजयंती उत्सवानिमित्त संस्थेचे उपाध्यक्ष (प्राथमिक) मा.श्री. किरण शहा, सचिव प्रा.मा.श्री. सतीश गायकवाड (सर) व सर्व संचालक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

पंचकोशाधारित गुरुकुलचे प्रणेते वंदनीय वा. ना. अभ्यंकर तथा भाऊ यांच्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन...त्यांचे जीवनकार...
16/02/2026

पंचकोशाधारित गुरुकुलचे प्रणेते वंदनीय वा. ना. अभ्यंकर तथा भाऊ यांच्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन...
त्यांचे जीवनकार्य सदैव प्रेरणादायी राहील! शिक्षणासाठी निरपेक्ष सेवा करणारे ऋषीतुल्य व्यक्तिमत्व वा. ना. अभ्यंकर तथा भाऊ!🙏🙏

16/02/2026

दरवर्षीप्रमाणे या वर्षी जनहित प्रतिष्ठानच्या प्राथमिक व माध्यमिक विद्यालयाने शनिवार दि. १४ फेब्रुवारी २०२६ रोजी वर्गवार सायकल सहलींचे नियोजन केले. इ. ८ वी. (महर्षी व्यास) या वर्गातील विद्यार्थ्यांनी एकापाठोपाठ सायकल चालवत प्रवासाचा आनंद लुटत कष्टाने, धाडसाने व जिद्दीने बारामती – बोरी - बारामती असे ६० कि.मी. अंतर पूर्ण केले.

Address

Harikrupa Nagar, Deshpande Estate, Indapur Road
Baramati
413102

Opening Hours

Monday 8:30am - 5:30pm
Tuesday 8:30am - 5:30pm
Wednesday 8:30am - 5:30pm
Thursday 8:30am - 5:30pm
Friday 8:30am - 5:30pm
Saturday 8:30am - 5:30pm

Telephone

+917588148211

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Janhit Pratishathan Vidyaylay posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Janhit Pratishathan Vidyaylay:

Shortcuts

Share

Category