Dhamma Bharat - धम्म भारत

Dhamma Bharat - धम्म भारत

Share

This page shares reliable and factual information about Buddhism and Dr. Babasaheb Ambedkar. The term "Dhamma Bharat" means [Buddha] Dhamma's India.

I write in both Hindi as well as Marathi language on 'Dhamma Bharat' site. Dr. Babasaheb Ambedkar, Wikipedia - Internet, Buddha Dhamma, Society, National and Historical Character, Education, Culture, History, Politics etc. are my favorite topics on which I contribute to encyclopedia on Wikipedia and here on my personal capabilities. I value reliable and factual writing, so I write information with

13/07/2026

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा कोणता पैलू तुम्हाला सर्वाधिक प्रेरणादायी वाटतो? 💙

🔹 अर्थतज्ञ आंबेडकर
🔹 कायदेतज्ञ आंबेडकर
🔹 राजनीतितज्ञ आंबेडकर
🔹 समाजसुधारक आंबेडकर
🔹 शिक्षणतज्ञ आंबेडकर
🔹 यापैकी नसल्यास, तुमच्या मते त्यांचा कोणता अन्य पैलू सर्वाधिक महत्त्वाचा आहे?

तुमचे मत कमेंटमध्ये नक्की सांगा.

Photos from Rajkumar Badole's post 28/06/2026
17/06/2026

सुधारक #गोपाळगणेशआगरकर यांचा आज स्मृतिदिन. "रुढीप्रिय लोक मूर्ख नसतात; पण बहुतेक मूर्ख हे रुढीप्रिय असतात," असं म्हणणाऱ्या जॉन स्ट्युअर्ट मिल या ब्रिटिश विचारवंताचा आगरकरांवर मोठा प्रभाव होता. अन्यायाविरुद्ध झुंजण्याचा आपला स्वभाव त्यांनी कधीही सोडला नाही. बुद्धिवादी दृष्टिकोनातून समाजजीवनाचे विश्लेषण करून अन्याय, रूढी आणि परंपरा यांच्यावर त्यांनी आपल्या लेखनातून कडाडून हल्ले केले, ते #केसरी या वृत्तपत्राचे पाहिले संपादक होते.

अभिवादन...

16/06/2026

बरोबर उत्तर कोणते आहे? बौद्ध धर्माचे सर्वोच्च पवित्र स्थान कोणते मानले जाते?

16/06/2026

बाबासाहब राजनिती में क्यो आए?

11/06/2026

महाराष्ट्रातील धर्मनिहाय लोकसंख्या : बौद्धांची खरी संख्या किती असू शकते?
— धम्म भारत

2011 च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची एकूण लोकसंख्या 11,23,74,333 होती. त्यापैकी हिंदू 79.83% (8,97,03,057), मुस्लिम 11.54% (1,29,71,152) आणि बौद्ध 5.81% (65,31,200) होते. त्यामुळे महाराष्ट्र हा भारतातील सर्वाधिक बौद्ध लोकसंख्या असलेला राज्य ठरतो.

मात्र या आकडेवारीतील एक महत्त्वाची बाब अनेकदा दुर्लक्षित राहते. 2011 च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात 30,54,158 महार व्यक्ती धर्माने 'हिंदू' म्हणून नोंदल्या गेल्या होत्या. हा आकडा राज्याच्या एकूण लोकसंख्येच्या 2.72% इतका आहे.

महाराष्ट्रातील हिंदू महारांची लोकसंख्या (30.54 लाख) ही मातंग समाजाच्या एकूण लोकसंख्येपेक्षा अधिक आहे. इतकेच नव्हे, तर ही संख्या राज्यातील जैन, ख्रिस्ती, शीख, इतर धर्मीय आणि धर्म नमूद न केलेल्या व्यक्ती यांच्या एकत्रित लोकसंख्येपेक्षाही जास्त आहे. यावरून हिंदू म्हणून नोंदल्या गेलेल्या महार समाजाच्या लोकसंख्येचा महाराष्ट्राच्या धार्मिक आकडेवारीवर किती मोठा परिणाम होऊ शकतो, याची कल्पना येते.

जर या सर्व महार व्यक्तींनी आपला धर्म 'बौद्ध' म्हणून नोंदविला असता, तर महाराष्ट्रातील बौद्धांची लोकसंख्या 65,31,200 वरून थेट 95,85,358 इतकी झाली असती. म्हणजेच बौद्धांचे प्रमाण 5.81% वरून 8.53% पर्यंत पोहोचले असते. दुसरीकडे हिंदू लोकसंख्या 79.83% वरून 77.11% पर्यंत खाली आली असती.

याचा अर्थ असा की महाराष्ट्रात बौद्ध धर्म स्वीकारलेल्या किंवा बौद्ध वारसा असलेल्या लाखो लोकांची धार्मिक नोंद प्रत्यक्ष बौद्ध लोकसंख्येत प्रतिबिंबित होत नाही. परिणामी जनगणनेतील बौद्धांची संख्या वास्तविक सामाजिक आणि ऐतिहासिक पार्श्वभूमीच्या तुलनेत कमी दिसून येते.

जनगणना 2027 का महत्त्वाची आहे?

जनगणना ही केवळ लोकसंख्या मोजण्याची प्रक्रिया नसून ती देशातील विविध धर्म, भाषा, जाती आणि सामाजिक गटांचे अधिकृत सांख्यिकीय चित्र तयार करते. सरकारी अहवाल, संशोधन, धोरणनिर्मिती, शैक्षणिक अभ्यास आणि आंतरराष्ट्रीय संस्थांकडून वापरली जाणारी धार्मिक आकडेवारी जनगणनेवरच आधारित असते.

म्हणूनच 2027 च्या जनगणनेत बौद्ध धर्माचे अचूक प्रतिनिधित्व व्हावे असे वाटत असेल, तर बौद्ध धर्म स्वीकारलेल्या किंवा स्वतःला बौद्ध मानणाऱ्या व्यक्तींनी धर्माच्या चौकटीत स्पष्टपणे "बौद्ध" अशी नोंद करणे आवश्यक आहे.

विशेषतः हिंदू म्हणून नोंदल्या गेलेल्या महार तसेच इतर बौद्ध समाजघटकांच्या धर्मनोंदणीचा बौद्ध लोकसंख्येच्या अंतिम आकडेवारीवर मोठा परिणाम होऊ शकतो. काही लाख लोकांच्या धर्मनोंदणीतील बदलामुळे राज्यातील बौद्धांचे प्रमाण अनेक टक्क्यांनी वाढू शकते.

लक्षात ठेवा

धर्म आणि जात हे दोन वेगवेगळे घटक आहेत. जनगणनेत जात म्हणून "महार" नोंदविणे आणि धर्म म्हणून "बौद्ध" नोंदविणे यात कोणताही विरोधाभास नाही. त्यामुळे ज्यांची धार्मिक ओळख बौद्ध आहे, त्यांनी धर्माच्या रकान्यात "बौद्ध" हीच नोंद करणे महत्त्वाचे आहे.

2027 ची जनगणना महाराष्ट्रातील बौद्ध समाजाचे खरे लोकसंख्यात्मक चित्र देशासमोर आणण्याची एक महत्त्वाची संधी ठरू शकते.

— Dhamma Bharat - धम्म भारत ( DhammaBharat.com )

#बौद्ध #महार #हिंदूमहार #महारहिंदू #महारबौद्ध #बौद्धमहार

06/06/2026

अनुसूचित जातींमध्ये सर्वाधिक प्रमाण महार समाजाचे!

महाराष्ट्रातील अनुसूचित जाती हा 59 जातींचा-जातसमुहांचा प्रवर्ग आहे.

2011 च्या जनजणनेनुसार अनुसूचित जातींमधील 3 प्रमुख जातींची टक्केवारी 92.53 आहे. उर्वरित 7.47 टक्क्यांमध्ये ढोर, खाटीक, कैकाडी, डक्कलवार यांच्यासह 56 जातसमुहांचा समावेश आहे.

या 59 जातींच्या समूहाला अनुसूचित जाती (SC) आणि दलित असे संबोधले जाते.

- Dhamma Bharat - धम्म भारत

#अनुसूचितजाती #दलित #महार #मांग

Want your school to be the top-listed School/college in Aurangabad?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Telephone

Address

Aurangabad