Raje Shahaji College

Raje Shahaji College

Share

SSC, HSC, BA,BCom,BSc College

Photos from Raje Shahaji College's post 03/04/2025

*राजे शहाजी महाविद्यालय अंबेलोहळ येथे पदवी प्रमाणपत्र वितरण समारंभ*
गंगापूर (प्रतिनिधी) कृषी व ग्रामीण विकास प्रतिष्ठान संचलित राजे शहाजी महाविद्यालय अंबेलोहळ ता. गंगापूर जि. छत्रपती संभाजीनगर येथे पदवी वितरण समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला .
पदवी प्रमाणपत्र वितरण समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. डॉ.भारती गवळी संचालक परीक्षा व मूल्यमापन मंडळ डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर या होत्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे कार्यकारी संचालक श्री गणेश बनकर पाटील यांनी केले. त्यांनी विद्यार्थ्यांच्या जीवनातील पदवीचे महत्त्व सांगून पुढील वाटचालीसाठी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. डॉ.भारती गवळी यांनी पदवी प्राप्त विद्यार्थ्यांनी आई-वडिलांची महाविद्यालयाची व देशाची सेवा करावी असे प्रतिपादन केले तर कार्यक्रमाचे अध्यक्ष शिवाजी दादा बनकर पाटील यांनी पदवी पूर्व व पदव्युत्तर यांच्या मधला टप्पा म्हणजेच पदवी प्रमाणपत्र वितरण समारंभ होय असे प्रतिपादन केले सर्व मान्यवरांनी पदवी प्रमाणपत्राचे वितरण करून विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचे आभार वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. केसकर एस.बी.यांनी मानले कार्यक्रमासाठी विद्यार्थी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांची उपस्थिती होती.

Photos from Raje Shahaji College's post 03/03/2024

Shiv jayanti

Photos from Raje Shahaji College's post 03/03/2024

Science Experiments

Photos from Raje Shahaji College's post 03/03/2024

Farewell 2024

Photos from Raje Shahaji College's post 05/02/2024
Photos from Raje Shahaji College's post 11/01/2024

मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमांतर्गत राजे शहाजी महाविद्यालय येथे महावाचन उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते . यानिमित्त कवी कुसुमाग्रज यांच्या कवितांचे वाचन करण्यात आले तसेच "महासम्राट "या विश्वास पाटील यांच्या कादंबरीतील काही उतारे मुलांनी वाचन केले. विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी निर्माण व्हावी व त्यायोगे साहित्य प्रती त्यांच्या अभिरुचीत व सामान्य ज्ञानात वाढ व्हावी यासाठी हा महावाचन महोत्सव उपक्रम राबवला गेला आहे.

Photos from Raje Shahaji College's post 08/01/2024

*राजे शहाजी महाविद्यालयाची शैक्षणिक सहल उत्साहात संपन्न*
कार्यकारी संचालक
श्री गणेश बनकर पाटील विशेष उपस्थिती
*गंगापूर*( प्रतिनिधी) राजे शहाजी महाविद्यालय अंबेलोहळची शैक्षणिक सहल कर्नाटक राज्यातील हम्पी बदामी विजापूर या जागतिक वारसा लाभलेल्या स्थळांना 4 जानेवारी ते 6 जानेवारी दरम्यान संपन्न झाली दिनांक 4 जानेवारी रोजी चालुक्य राजांची राजधानी असलेल्या बागलकोट जिल्ह्यातील बदामी पर्यटन स्थळालाभेट दिली या ठिकाणी रॉक कट स्ट्रक्चरल मंदिरे प्रसिद्ध आहेत तसेच बदामी किल्ला अगस्त तलावाच्या शेजारी वालुकामय भूतनाथ मंदिर नटराजाची मूर्ती व चार गुहा बदामीचे विशेष आकर्षण आहेत ऐहोळे येथील दुर्गा व बनशंकरी देवीचे दर्शन घेतले
दिनांक 05 जानेवारी रोजी विजयनगरचा राजा कृष्णदेवराय व हरिहर बुक्क यांच्या साम्राज्याची राजधानी असलेल्या हम्पी पर्यटन स्थळास भेट दिली हम्पीचा उल्लेख पुराणामध्ये किस्किंदानगरी म्हणूनही आढळतो हम्पी हे जागतिक वारसा स्थळ म्हणून संयुक्त राष्ट्र संघटनेने घोषित केलेले जगप्रसिद्ध पर्यटन स्थळ येथे वीरपाक्ष मंदिर लोटस टेम्पल हत्ती तबेला कृष्ण मंदिर राजवाडा व विविध पर्यटन स्थळांना भेटी दिल्या तसेच अंजनी पर्वतातील बजरंग बली हनुमान यांच्या जन्मस्थानस भेट दिली सहा जानेवारी रोजी विजापूरचा गोल घुमट व पंढरपूर तीर्थक्षेत्र भेट दिली शैक्षणिक सहलीस *कार्यकारी संचालक श्री गणेश बनकर पाटील* , प्राचार्य डॉ.शिवाजी केसकर, सहल विभाग प्रमुख प्रा. निकिता जाधव मॅडम ,प्रा राजू धनवान ,प्रा अनिल चव्हाण, प्रा दीपा पटेल,श्री शेकनाथ चव्हाण श्री जयंत अंभोरे यांची उपस्थिती होती.

Photos from Raje Shahaji College's post 26/10/2023

एव्हरग्रीन इंग्लिश स्कुल आंबेलोहळ येथील विद्यार्थ्यांची अभ्यास सहल तुर्कांबाद ख ता.गंगापूर येथे आयोजित करण्यात आली
पारंपारिक कुंभार काम, मातीपासून विविध वस्तू निर्मिती करताना प्रत्यक्ष भेट देऊन कामाची पाहणी केली
रामचंद्र चव्हाण, ज्ञानेश्वर चव्हाण, व जितेंद्र चव्हाण यांनी विद्यार्थ्यांना उत्तम मार्गदर्शन केले
संस्थेमार्फत त्यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला व कामाचे व कलेचे कौतुक करून त्यांचे मनपूर्वक आभार मानले

Want your school to be the top-listed School/college in Aurangabad?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Telephone

Website

Address

Aurangabad
431133