*सुनंदाई युवराज फाऊंडेशन, भोणे* *ता. धरणगाव, जि.जळगाव*
सुनंदाई युवराज फाऊंडेशन हे सामाजिक, शैक्षणिक आणि पर्यावरणपूरक उपक्रमांतून समाज uplift करण्याचे ध्येय ठेवून कार्यरत आहे. ग्रामीण भागातील प्रत्येक घटकापर्यंत शासनाच्या योजना, ज्ञान आणि संधी पोहोचवणे हा आमचा मुख्य उद्देश आहे.
आमच्या प्रमुख उपक्रमांपैकी काही
*1. पर्यावरण संवर्धन*
झाडे लावा, झाडे जगवा मोहिमेद्वारे वृक्षारोपण आणि वृक्षसंवर्धन.
पाणी आडवा, पाणी जिरवा मोहिमेतून पाणी साठवण, शेततळी, जलसंधारणाबाबत जनजागृती.
*2. शैक्षणिक व करिअर मार्गदर्शन*
विद्यार्थ्यांसाठी एमपीएससी/यूपीएससी मार्गदर्शन सत्रे आणि चर्चासत्रांचे आयोजन.
शैक्षणिक स्पर्धा, निबंध स्पर्धा व कार्यशाळा घेऊन ग्रामीण विद्यार्थ्यांना संधी उपलब्ध करून देणे.
बेटी बचाव, बेटी पढाव अभियानातून मुलींच्या शिक्षणासाठी विशेष उपक्रम.
*3. शेती व ग्रामीण विकास*
शेतकऱ्यांना आधुनिक शेती पद्धती, पीक व्यवस्थापन, सेंद्रिय शेती आणि बाजारपेठेची माहिती देणे.
कृषी विषयक कार्यशाळा आणि तज्ज्ञांचे मार्गदर्शन.
*4. शासनाच्या योजना जनतेपर्यंत*
शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवणे.
महिलांसाठी, तरुणांसाठी आणि शेतकऱ्यांसाठी शासकीय अनुदाने व योजनांचा लाभ घेण्यासाठी मदत.
*5. सामाजिक उपक्रम*
गरजू कुटुंबांना मदत, आरोग्य शिबिरे, रक्तदान शिबिरे.
ग्रामीण भागातील सर्वांना सहकार्य व सामाजिक बांधिलकीची जाणीव करून देणे.
*सुनंदाई युवराज फाऊंडेशन* हे सर्व क्षेत्रात “ *सर्वांना सहकार्य – सर्वांना मदत”* या ब्रीदवाक्याने प्रेरित आहे.
आपला एक छोटा सहभागही समाज परिवर्तनासाठी मोठा पाऊल ठरेल.
“ *एकत्र या, झाडे लावा, शिक्षण* *वाढवा, समाज घडवा!”*
S.B.High School Gondegaon
Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from S.B.High School Gondegaon, School, Gondegaon, .
28/08/2025
24/12/2021
*सरस्वती भुवन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय गोंदेगाव ता. सोयगाव जि. औरंगाबाद
येथे 'निपुण भारत अभियान' अंतर्गत थोर भारतीय गणित तज्ज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय गणित दिनानिमित्त 'गणितोत्सव' त्री दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवाचे उद्घाटन प्रशालेचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य आदरणीय श्री चितोडकर सर व उपमुख्याध्यापक श्री माळी सर यांच्या हस्ते दि. 20 डिसेंबर 2021 रोजी करण्यात आले. 'गणितोत्सव' अंतर्गत विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते . त्यात प्रामुख्याने वक्तृत्व स्पर्धा, परिपाठ, रांगोळी स्पर्धा, भित्ति पत्रक स्पर्धा यांचा समावेश करण्यात होता. गणितोत्सव चा समारोप दि. 22 डिसेंबर 2021 रोजी शालेय समिती अध्यक्ष आदरणीय डॉ. श्री योगेशजी इंगळे सर व शालेय समिती सदस्य नाना सो. श्री . सुधाकर जी महालपूरे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. डॉ. श्री. योगेशजी इंगळे यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून गणित तज्ज्ञ श्री निवास रामानुजन यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन करण्यात आले. महोत्सवात विद्यार्थ्यांना गणित विषयाची आवड निर्माण व्हावी, गणितीय संकल्पना स्पष्ट व्हाव्यात, त्यांच्या सर्जनशील विचाराला चालना मिळावी, नवनिर्मितीची बीजे रुजली जावीत म्हणून गणितीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांना शालेय जीवनात व्यावहारीक ज्ञान, कौशल्य प्राप्त व्हावे हा उद्देशाने कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक क. म. वि. चे प्रा.एस.जी. पोंदे सर यांनी केले तर आभारप्रदर्शन श्री अग्रवाल यांनी केले. श्री योगेशजी इंगळे सर यांनी गणिताचे महत्व सांगितले तर प्राचार्य चितोडकर सर यांनी गणिताची व्याप्ती सांगितली. महोत्सव यशस्वी करण्यासाठी गणित शिक्षक श्री. जी. जी. ढाकणे सर , श्री अग्रवाल, श्री भूषण महालपूरे , श्री.एम. बी. पाटील, श्री कोळी, प्रा. दिनेश जी गजभिये , संयोजिका श्रीमती दाबके मॅम कलाशिक्षक श्री तोगे, वरिष्ठ लिपिक श्री दुबे सर , सेवक श्री मनोज भाऊ देशमुख , अतुल भाऊ वखरे व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी प्रयत्न केलेत व कार्यक्रम यशस्वी केलात सर्वांचे गणित विभाग व प्रशालेच्या वतीने खूप खूप धन्यवाद* !!! ,.💐💐💐*
, ,
22/11/2017
सभु प्रशाला गोंदेगाव येथे विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले यावेळी उपमुख्याध्यापक पाडले सरांनी प्रदर्शनाचे उद्घाटन केले प्रदर्शनात सर्व विज्ञान शिक्षकांनी सहभाग घेतला.
21/11/2017
" मराठवाडा मुक्तीसंग्रामाचे थोर सेनानी, थोर समाजसेवक, शिक्षण महर्षी, पद्मविभुषण कै.गोविंदभाईजी श्राँफ.....यांच्या
पावन स्म्रतीस शतशत वंदन..... विनम्र अभिवादन !! "
21/11/2017 .
14/10/2017
आदरणीय,पुज्यनीय,शिक्षणमहर्षी मा.आण्णासो का.ञ्य.नानकर सर यांचा वाढदिवस साजरी होत असताना एक क्षण
15/09/2017
आज दिनांक 15/9/2017रोजी .श्री. स.भु.प्रशाला,गोदेगाव ता.सोयगाव, फुटबॉल मोहत्सवा अतंर्गत फुटबॉल स्पर्धा आयोजन करण्यात आल्या.