Sbfied.com

Sbfied.com

Share

पोलीस भरती आणि तलाठी भरती सोशलिस्ट

15/06/2025
28/04/2024

**मूर्ख माणसाची ट्रॉली**

शॉपिंग मॉलमध्ये ट्रॉलीत मी जशी एक वस्तू टाकली तसे एक वृद्ध काका माझ्याकडे सारखे बघायला लागले.

चुकून आपण दुसरेच भलते सलते टाकले की काय असे वाटून मी ती गोष्ट पुन्हा चेक केली - लवंग होती ती! काही वेगळे नव्हते.

तितक्यात मागून त्यांचा आवाज आला - “ स्मार्ट आहे तुम्ही - सगळी यादी मोबाईल मध्ये लिहून आणली. मी तर कागदावर लिहिली पण घरी विसरलो”

आजोबा भोळसर असणार हे मला समजले होते पण मला
स्मार्ट म्हणाल्याने मी खूप खूष झालो.

अर्धा तास शॉपिंग केल्यावर माझी ट्रॉली भरत आणि मोबाईल मध्ये असणारी यादी संपत आली होती. ही शॉपिंग पूर्ण करून मला आज लवकर घरी जायचे होते.

बिलिंग काउंटरच्या जवळ आलो पण एका युवतीच्या ट्रॉलीमध्ये परफ्यूम दिसला म्हणून मला पण क्लिक झाले की मला पण घ्यायचा आहे.

अडचण अशी होती की परफ्यूमचे रॅक खूप लांब होते आणि गर्दी खूप जास्त होती.
ट्रॉली लोटत पुन्हा मागे गेलो असतो तर आणखी 15 मिनिट वाया गेले असते.

काहीच वेळापूर्वी काका मला स्मार्ट म्हणाले होते पण मी सुद्धा वस्तू विसरलो होतो.

पण म्हणून मला माझा स्मार्टपणा कमी होऊ द्यायचा नव्हता. ट्रॉली मागे लोटत नेण्यापेक्षा मी ती बिलिंग काउंटर च्या बाजूला असणाऱ्या चॉकलेटच्या रॅक जवळ लावून ठेवली आणि एकटाच परफ्युम आणण्यासाठी गेलो.

हा माझा आणखी एक स्मार्टपणा होता.

पाच मिनिटांनी परफ्युम घेऊन परत आलो.
मॉलमध्ये आपण जितके जास्त थांबू तितकी जास्त खरेदी करू याचा अनुभव मला आला कारण परत येताना घेण्यासारख्या आणखी दोन तीन गोष्टी मला आठवल्या.

मी ट्रॉली जवळ आलो. त्यात परफ्यूम टाकला आणि येताना आठवलेले - रूम फ्रेशनर, हाईलायटर, डायरी यांची खरेदी करण्यासाठी पुन्हा ट्रॉली घेऊन मागे गेलो.

वस्तू घेतल्या आणि ट्रॉली लोटत पुन्हा बिलिंग काऊंटरकडे जाऊ लागलो.

ट्रॉलीकडे सहज लक्ष गेले तर माझ्या तळपायाची आग मस्तकात गेली. कारण -

माझ्या ट्रॉलीमध्ये रुमाल, स्टीलचे डब्बे, तेलाची पिशवी असे काय काय सामान होते पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे ट्रॉलीत असणाऱ्या या गोष्टी मी टाकल्या नव्हत्या.

कोणीतरी मूर्ख माणसाने त्याची ट्रॉली समजून माझ्या ट्रॉलीमध्ये त्याच्या 10/12 वस्तू टाकल्या होत्या त्यात फक्त माझा परफ्यूम, साखर हेच ओळखीचे वाटत होते.

“ किती मूर्ख लोक असतात… आता या सगळ्यात माझे सामान कोणते आणि त्याचे कोणते? कसे वेगळे करू?”

“ एकतर ऑफिसमुळे इकडे येणे होत नाही आणि या मूर्खाच्या चुकीमुळे मला माझा आता आणखी वेळ वाया घालवावा लागेल”

माझ्या यादीत 35/40 वस्तू होत्या त्यात याच्या 10/12 वस्तू - काय माझे काय त्याचे? करताना आणखी 15 मिनिटे वाया जातील आणि तोपर्यंत काउंटरवर गर्दी वाढत जात होती म्हणजे आणखी 20 मिनिटे लाईन मध्ये वेटींग!

खरंतर मला आज लवकर घरी जायचे होते.

त्या माणसाच्या बावळटपणामुळे माझा अर्धा तास आणखी वाया जात होता.

मी आजची शॉपिंग कॅन्सल करून काहीच न घेता घरी जायचे ठरवले. रागात ती ट्रॉली तशीच कपड्याच्या सेक्शन मध्ये लोटून दिली.

तो कोण होता? कसा होता? हे माहीत नव्हते पण तो नक्कीच तोंडावर 2/4 शिव्या द्याव्यात असे वागून गेला होता.

तो मला भेटायला पाहिजे होता - नक्कीच त्याच्यावर तोंडसुख घेतले असते मी.

तितक्यात मला आठवले. माझ्या ट्रॉलीत तो त्याची शॉपिंग टाकत होता म्हणजे नक्कीच तो आतापण त्या चॉकलेटच्या रॅकजवळ असेल जिथे माझी ट्रॉली मी सोडून गेलो होतो.

त्याला मनात शिव्या देत मी चॉकलेटच्या रॅकजवळ आलो. तो मूर्ख सापडणार नव्हता पण तरी मी त्याला शोधत होतो.

रॅक जवळ आलो पण बघतो तर काय?
एका ट्रॉलीमध्ये असणारी काळी लवंग चमकत होती.

मला का दिसली? कारण मी सुद्धा काही वेळापूर्वी घेतली होती. त्यानंतर मला त्यात हार्पिक दिसले.

मी आणखी पुढे गेलो - फरसाण, टी शर्ट, नाईट पॅन्ट हे सर्व माझ्या ओळखीचे होते.. इतकेच नाही ती संपूर्ण ट्रॉली माझ्या ओळखीची होती.

असे कसे? ती उभी होती ती माझी ट्रॉली होती.
माझी ट्रॉली इथे आहे तर मी रागात ढकलून दिली ती कोणाची होती?
ही ट्रॉली आणखी चॉकलेट रॅकजवळ उभी आहे तर मी मगाशी आठवलेल्या गोष्टी घेण्यासाठी लोटत नेली ती कोणाची ट्रॉली होती?

मला स्वतः वर हसू आले कारण माझी ट्रॉली तिथेच होती.

मी परफ्यूम घेऊन आलो तेव्हा चुकून त्या सज्जन व्यक्तीच्या ट्रॉलीमध्ये टाकला आणि तीच माझी ट्रॉली समजुन आठवलेल्या 3/4 वस्तू घ्यायला मागे गेलो होतो.

माझी चूक समजली.

चोरट्या पावलांनी मी माझी खरी ट्रॉली घेऊन मी गुपचूप बिलिंग काऊंटर कडे निघालो.

ज्या सज्जन माणसाची ट्रॉली मी घेऊन आलो होतो तो आता मला मनात शिव्या देत असणार हे मला माहीत होते.

मगाशी माझा अर्धा तास वाया जाणार हे समजून मी त्याला मूर्ख म्हणत होतो पण मी त्याची 1 तासाची शॉपिंग असणारी ट्रॉली अज्ञात ठिकाणी ढकलून आलो होतो.

तो कुठे असेल ? कसा असेल? किती वेळापासून शोधत असेल? हे मला माहिती नव्हते पण त्याच्या तोंडात माझ्यासाठी ‘महामूर्ख’ याशिवाय वेगळे विशेषण नसेल हे मला पक्के माहीत होते.

यादी घरी विसरणारे भोळसर काका मला स्मार्ट म्हणाले होते तर खरं, पण ज्याची ट्रॉली मी गायब करून टाकली होती तो मला काय म्हणत असेल याचा विचार करतच मी घरी निघालो.

एका लवंगेने मूर्ख माणसाच्या व्याख्येत नेमके कोण बसले हे दाखवून दिले होते

( 2023 मध्ये केलेली एक अनोखी शॉपिंग )

23/04/2024

*100 रू ची नोट*

देवगिरी कॉलेजच्या कॅम्पस मध्ये 3 4 किन्नर माझ्याकडे पैसे मागायला येऊ लागले.
मी तेव्हा 20 वर्षाचा भित्रा मुलगा होतो.
आणि खिश्यात फक्त 2 रूपये होते.

माझे मित्र मन्या आणि स्वप्निल सोबत होतो पण पैसे कोणाकडेच नव्हते.

त्यातील एका किन्नरानी माझ्या खूप जवळ येऊन विक्षिप्त हातवारे करत पैसे मागायला सुरूवात केली. मी घाबरलो. खिशातील 2 रुपये काढून दिले.

2010 वर्षी 2 रुपये खूप कमी रक्कम होती. किन्नराने मला शिव्या देणे, शरीराला किळसवाणा स्पर्श करणे सुरू केले.
स्वप्नील धिप्पाड उंचपुरा होता पण यांच्याशी कोण भांडणार?

मन्या पुढे आला.
खिशात हात घालून त्याने पॉकेट काढले.
किन्नारला कमीत कमी 10 रुपये पाहिजे होते.
मन्याच्या पॉकेट मध्ये खूप दिवसांची जपून ठेवलेली 100 रू ची नोट होती.
सुट्टे नाही सांगून पण किन्नर ऐकेना.
‘मी देते सुट्टे, 10 घेते आणि 90 परत देते’ सांगून मागणी सुरूच होती.

मन्याने जशी 100 रू ची नोट दिली तसे सगळे किन्नर घोळका करून जमा झाले. त्यांनी प्रत्येकाने 10 10 रू वाटून घेतले आणि आमच्या डोक्यावर हात ठेवून ते सर्व पुढे गेले.

हे या महिन्यात उरलेले शेवटचे 100 रू होते.
आता रूमवर स्टोसाठी रॉकेल कसे आणायचे? जेवण कसे बनवायचे? बाजार कसा करायचा? खायचे काय? असे सर्व प्रश्न डोक्यात एकापाठोपाठ घाव घालू लागले.

स्वप्नील आणि मी मन्याला त्याच्या मूर्खपणासाठी दोष देऊ लागलो. गरीब घरच्या आणि शिक्षणासाठी रूमवर राहणाऱ्या बॅचलर मुलांसाठी 100 रू खूप मोठी रक्कम असते.

या लोकांशी कोणी भांडू शकत नाही आणि भांडलो तरी त्यांचे शिव्या शाप कोणी घेऊ शकत नाही. मान खाली घालून आम्ही 8 किमी लांब आमच्या रूमवर पायी जायला निघालो.

पण थोडे पुढे गेल्यावर लक्षात आले मन्या आमच्यात नव्हता.
म्हणून आम्ही मागे वळलो. मन्याने त्यांच्यातील एका किन्नरचा हात पिरगळला होता. ‘माझे पैसे दे’ तो म्हणत होता.

थोड्यावेळापूर्वी त्यांचा शिव्याशाप नको म्हणणारे आम्ही आता त्यांच्याशी मार-पीट करत होतो.

त्यांच्यातील एकाने शिव्या द्यायला सुरुवात केली. आजूबाजूचे लोक बघत होते. आम्हाला खूप लाजिरवाणे वाटत होते. कॉलेजला जाणाऱ्या तरुण पोरांनी किन्नराशी असे झटावे हेच मुळात खूप विचित्र होते.

पण प्रश्न 100 रुपयांचा नव्हता तर रात्री काय जेवावे याचा होता. खिशात दमडी नसताना महिना कसा काढावा याचा होता. आठवडाभर भाजीत तेल टाकावे की फक्त पाणी टाकावे याचा होता.

त्यांची संख्या 15 16 असेल आम्ही फक्त तिघे.
या लढाईचा निकाल लागला होता. आम्ही हरलो होतो.

तितक्यात किन्नरांचा म्होरक्या आला. आता खूप मार खावा लागेल हे समजून चुकले होते. त्याने मन्याचा हात जोऱ्याने ओढला आणि अक्षरशः पाडायचे बाकी ठेवले.

एकटा मन्या लढताना पाहून आम्ही तोंड उघडले. त्या म्होरक्याला आम्हाला यांनी कसे फसवले हे सांगितले. आम्ही विद्यार्थी आहोत हे सांगितले.

म्होरक्याने त्या किन्नरच्या कमरेला अडकवलेली 100 रू ची नोट काढली आणि मन्याच्या हातात दिली. आमच्या तिघांच्या डोक्यावर हात ठेवून आम्हाला आशिर्वाद दिला आणि जा म्हणून सांगितले.

“.. मांग के लेगी पर इमानदारीसे लेगी..” असे मला ऐकायला आले.

शेवटी आम्हा गरीब मुलांच्या पोटातली भूक त्यांच्या पोटातल्या भुकेवर वरचढ ठरली. शिव्याशाप आशिर्वादात बदलले.

पोटात भुक असेल तर माणूस आपोआप संघर्ष करतो हे सिद्ध झाले.

या गोष्टीला आज 14 वर्ष झालेत पण आजही सिग्नलवर 10 रुपये देताना एकचं वाक्य ऐकू येते -
“.. मांग के लेगी पर इमानदारीसे लेगी..”

( डीएड ची आठवण - L2GN )

09/03/2024

या वर्षी वर्दी पाहिजे असेल तर नक्की Follow करा कारण इथे फक्त परीक्षेला 100% येणारेच प्रश्न दिले जातात
या प्रश्नाची PDF पाहिजे असेल तर Follow करून वरती DM करा

𝗙𝗢𝗟𝗟𝗢𝗪
𝗙𝗢𝗟𝗟𝗢𝗪
𝗙𝗢𝗟𝗟𝗢𝗪

LIKE
COMMENT
SHERE✅

Want your school to be the top-listed School/college in Aurangabad?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Address

Aurangabad