04/01/2016
पृथ्वीवर ७५% पाणी असले तरी १.२५% पाणीच पिण्यायोग्य आहे. यावरूनच मानवाने पाण्याचे मोल जाणले पाहिजे आणि पावसाचा प्रत्येक थेंब साठवला पाहिजे. समुद्रात वाहून जाणारे पाणी जमिनीत मुरुवले पाहिजे. त्याचा योग्य वापर केला पाहिजे. यामुळे पाणीटंचाई या समस्येला सामोरे जाण्याची वेळ येणार नाही.
सध्याचा दुष्काळ हा मानवनिर्मित आहे म्हंटले तर अतिशयोक्ती ठरू नये. बेसुमार वृक्ष तोड आणि झाडे लावण्याच्या बाबतीत उदासीनता , पाण्याचा अपव्यय ,हि कारणे पुरेशी आहेत. 'अति तीथे माती ' या म्हणीप्रमाणे माणसाचा अतिरेकच त्याचा विनाशाला कारणीभूत ठरत आहे. हे समजत असतानाही तो सावध होत नाही ,याला काय म्हणावे?
निसर्गाने दिलेल्या या धोक्याच्या घंटेने सावध झालेले एक गांव खटाव तालुक्यातील ‘जाखनगांव’ . सातारा, कोरेगाव पासून आग्नेय दिशेला 15 K M वर हे एक छोटेशे गांव, जिथे दुष्काळ बारा महिने होता. गावाने जलसंधारणमधून विकास केला. आता हे गांव शासनाच्या जागेत कोणताही मोबदला नसताना रोपटी जागवण्याचे प्रयत्न करत आहे.
या गावाने दुष्काळी झळा खूप सोसल्या आहेत, एक काळ असा होता की दिवाळी झाली की टँकरची मागणी करावी लगायची, व 35 लीटर पाणी पर घर दिले जात होते. पण आज तेच गांव जलसंधारण मधून परिपुर्ण बनले आहे व आता ते वृक्ष लागवडीकडे वळले आहे; मिळेल त्या जागी झाड लाउन ते जगवण्याचे प्रयत्न सुरु आहे. आताची जागा शाषणाची आहे पण केवळ सामाजिक बंधीलकीच्या भावनेतून हे सुरु आहे, त्या गावकर्यांचे करावे तेवढे कौतुक कमीच !
पावसाचे वाहून जाणारे पाणी जमिनीतून मुरवून पाण्याच्या बाबतीत प्रत्येक गाव जर स्वयंपूर्ण झाला तर शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ येणार नाही.
जाखन गावकर्यांचा आदर्श घेवून आपापल्या गावासाठी एकजूट झाले पाहिजे. शासनाच्याच मदतीची वाट पाहण्याएवजी आपण सुरुवातर करू शकतो. झाडे लावण्याच्या बाबतीत जागृत