21/01/2026
विद्यापीठात 23 जानेवारी रोजी ‘व्हिजनरी : डॉ. योगेश ब्रााम्हणकर यांच्याशी संवाद’ कार्यक्रमाचे आयोजन
विद्याथ्र्यांना स्टार्टअप्सबाबत योग्य दिशा मिळावी, त्यांना शासकीय योजनांची माहिती व्हावी आणि भविष्यातील रोजगाराच्या संधींचा शोध घेता यावा, या उद्देशाने येत्या 23 जानेवारी रोजी दुपारी 3.00 वाजता विद्यापीठातील जैवतंत्रज्ञान विभागाच्या सभागृहामध्ये ‘व्हिजनरी : डॉ. योगेश ब्रााम्हणकर यांच्याशी संवाद’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयातील इनोव्हेशन सेलचे संचालक डॉ. योगेश ब्रााम्हणकर हे विद्याथ्र्यांना महत्वपूर्ण मार्गदर्शन करणार आहेत.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान जैवतंत्रज्ञान विभागप्रमुख डॉ. प्रसाद वाडेगावकर भूषविणार असून प्रमुख अतिथी म्हणून विद्यापीठाच्या इनोव्हेशन, इन्क्युबेशन अॅन्ड लिंकेजेसचे संचालक डॉ. अजय लाड, इन्क्युबेशन सेंटरच्या प्रमुख प्रा. स्वाती शेरेकर उपस्थित राहणार आहेत. तरी विद्याथ्र्यांनी अधिकाधिक संख्येने उपस्थित राहून या मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रा. सुदर्शन कोवे, सीईओ आनंद यादव, व्यवस्थापक अमोल हिरुळकर यांनी केले आहे.
--------------------------------