Shri Tansukhdas Rathi Vidyalaya,Warha

Shri Tansukhdas Rathi Vidyalaya,Warha Shri Tansukhdas Rathi Vidyalay warha

श्री. तनसुखदास राठी विद्यालय वऱ्हा येथे शिवजयंती निमित्त राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धेचे आयोजन...                   श्री....
10/03/2026

श्री. तनसुखदास राठी विद्यालय वऱ्हा येथे शिवजयंती निमित्त राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धेचे आयोजन... श्री. गणेशदास राठी छात्रालय समिती अमरावती द्वारा संचालित श्री. तनसुखदास राठी विद्यालय वऱ्हा येथे आम्ही सेवेकरी बहूउद्देशिय संस्था अमरावती यांच्या द्वारे शिवजयंती निमित्त राज्यस्तरीय ऑनलाईन चित्रकला स्पर्धेचे (5 ते 18) वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी आयोजन करण्यात आलेले होते. सदर परीक्षेकरिता एकूण 300 विद्यार्थी प्रविष्ट झालेले होते. तनसुखदास राठी विद्यालय वऱ्हा येथील विद्यार्थिनी कु. सानिका वानखडे या परीक्षेत राज्यस्तरावर द्वितीय क्रमांक घेऊन उत्तीर्ण झाली. मराठी गौरव भाषा दिन व विज्ञान दिवसाचे औचित्य साधून तिचा आज दिनांक 28 फेब्रुवारीला विद्यालयाचे माननीय मुख्याध्यापक संजय पाचंगे तसेच आम्ही सेवेकरी बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष मा. हर्षद धांडे, सेवेकरी लुकेश बद्रे, संजित वानखडे, अनिकेत अस्तिकर यांच्या मार्फत तिचा प्रमाण पत्र, पदक देऊन सत्कार करण्यात आला. तिला या परीक्षेकरिता विद्यालयाच्या कला शिक्षिका रोशनी गंगन यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तिच्या या यशस्वी वाटचाली करिता व उज्वल शैक्षणिक भविष्याकरिता विद्यालयातील संपूर्ण शिक्षक वृंद तसेच सर्व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी तिला शुभेच्छा प्रदान केल्या......

Address

Warha
Amravati
444903

Telephone

+917385029296

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shri Tansukhdas Rathi Vidyalaya,Warha posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to Shri Tansukhdas Rathi Vidyalaya,Warha:

Shortcuts

Share

Category