09/09/2023
कृषी होलिक'तर्फे दुग्धजन्य पदार्थांची विक्री
पुणे कृषी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे 'स्टार्ट अप'
पुणे : कृषी शिक्षणासोबत विक्री कौशल्य, आर्थिक व्यवहार आणि बाजारपेठेतील ग्राहकांची नेमकी समजून घेण्यासाठी पुणे कृषी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी 'कृषी होलिक' स्टार्ट अप सुरू केले आहे. फुल
मागणी काय? हे
याबाबत कृषी महाविद्यालयातील साक्षी घोलप, तेजल पवार म्हणाल्या, की गेल्या वर्षी आठ विद्यार्थ्यांनी मिळून 'कृषी होलिक' स्टार्ट अप सुरू केले. याचा उद्देश म्हणजे शिक्षणासोबत
'कृषी होलिक' स्टार्ट अपमधील विद्यार्थी.
दुग्धजन्य पदार्थांची निर्मिती, विक्री नियोजन ग्राहकांसोबत संवाद साधण्याची कला, शहरी बाजारपेठेची मागणी समजून घेणे हा आहे. गेल्या वर्षी महाविद्यालयातील देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्रामध्ये दुग्धजन्य पदार्थ निर्मिती आणि गोमय गणेश मूर्तिकलेचे प्रशिक्षण घेतले. प्रायोगिक तत्त्वावर पर्यावरणपूरक ४० गणेशमूर्तीची निर्मिती व विक्री केली. 'स्टार्ट अपने गेल्या वर्षी पन्नास हजारांची उलाढाल
'कृषी होलिक'चे सदस्य
पवार, ओंकार कदम, श्लोक कृषी Holic
मेहूल शहा, यश विधाते, निखिल जगताप, साक्षी घोलप, तेजल वाबळे, ऋतुराज पाटील, आदित्य पाटील, मेहूल भालेराव, वेदांत पुंड, नीरज मालूमल, विराज तडसे, वैशाली परदेशी, वैष्णवी गोरे, प्रतीक्षा फडतरे, अमृता शेंडे, आर्या सूर्यवंशी, राजेश्वरी गोरे, सलोनी माने, अमृता माने.
केल्याने आत्मविश्वास वाढला.
यंदा 'स्टार्ट अप' सोबत कृषी व उद्यानविद्या महाविद्यालयातील एकवीस विद्यार्थी जोडले आहेत. याबाबत यश विधाते, निखिल जगताप म्हणाला, की स्टार्ट अपमध्ये तेरा हजार रुपये गुंतवणूक केली आहे. कृषी महाविद्यालयाच्या विक्री केंद्रावर गोमय गणेशमूर्ती, धूप, पणती याचबरोबरीने देशी गाईचे तूप, खवा, मोदक, फॅट फ्री लस्सी, पनीर, पेढे तसेच गांडूळ खत,
प्रॉम खत विक्री सुरू केली आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांतकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार 'फुले अमृत' ब्रॅण्ड तयार केला आहे. उत्पादनांच्या विक्रीतून दीड लाखांची उलाढाल अपेक्षित आहे. आम्हाला सहयोगी अधिष्ठाता डॉ. सुनील मासळकर, डॉ. सोमनाथ माने, डॉ. धीरज कणखरे, डॉ.प्रमोद पाटील तसेच विभागांतील प्राध्यापकांचे मार्गदर्शन मिळाले आहे.