पंचकोशाधारित गुरुकुल अर्थात 12 तासांची शाळा

  • Home
  • India
  • Ambarnath
  • पंचकोशाधारित गुरुकुल अर्थात 12 तासांची शाळा

पंचकोशाधारित गुरुकुल अर्थात 12 तासांची शाळा विकसित व्हावे अर्पित होऊन जावे !

13/08/2026

हार्दिक अभिनंदन🌸💐

दि एज्युकेशन सोसायटी, अंबरनाथ संचालित, भा. प. वि. अंतर्गत पंचकोशाधारित गुरुकुलच्या विद्यार्थ्यांनी आपल्या सुमधुर स्वरांनी, उत्कृष्ट सांघिक सादरीकरणाने आणि आत्मविश्वासपूर्ण प्रदर्शनाने आंतरशालेय समूहगायन स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावून गुरुकुलच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला.

दिनांक १० ऑगस्ट २०२६
या दिवशी इनरव्हील क्लब ऑफ अंबरनाथ, यांच्यातर्फे घेण्यात आलेल्या आंतरशालेय समूहगीत स्पर्धेमध्ये🎤🎼 पंचकोशाधारित गुरुकुलच्या विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक मिळवला. 👏🏻👏🏻👏🏻👏🏻

अंबरनाथ, कल्याण, वाशिंद या विभागातून जवळजवळ एकूण २५ शाळांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता.

जयतू जननी हे गीत या स्पर्धेत मुलांनी सादर केलं... अत्यंत कमी वेळात या सगळ्यांनी खूप मेहनत घेतली.

या निमित्ताने वेगवेगळ्या शाळेच्या विद्यार्थ्यांचे सादरीकरण (परफॉर्मन्स) मुलांना बघता आले. यातून आपल्या शाळेच्या विद्यार्थ्यांना बरंच काही शिकता आलं.

स्पर्धा म्हटलं की, मेहनत, परिश्रम, सातत्य, संयम, आपल्या कामाशी प्रामाणिकपणा या सगळ्या गोष्टी आज मुलांना प्रत्यक्ष अनुभवता आल्या.. आजच्या काळात स्पर्धेत टिकून राहायचं असेल तर मेहनत, चिकाटी, आणि स्वतःवरचा विश्वास किती महत्वपूर्ण आहे हे आज त्यांना या स्पर्धेतून शिकता आलं.

या स्पर्धेत गार्गी प्रभुदेसाई, मैत्रेयी खटावकर, स्वरा खरात, संचित दरगोडे, संस्कार पाटील, ईशान पुनस्कर, शार्दुल फलके, श्रवण बागल या विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक मिळवला. 🥳🥳

सर्व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र आणि समूहासाठी एक ट्रॉफी🏆 बक्षीस स्वरूपात मिळाली.

सर्व विद्यार्थ्यांचे खूप खूप कौतुक आणि अभिनंदन...

व्यक्तिपरीचय - श्री प्रसाद भावेसद्यस्थितीत विद्यार्थांचं  अभ्यासक्रम वगळून अवांतर वाचन दुरापास्त झाले आहे. त्यामुळे व्यत...
08/08/2026

व्यक्तिपरीचय - श्री प्रसाद भावे

सद्यस्थितीत विद्यार्थांचं अभ्यासक्रम वगळून अवांतर वाचन दुरापास्त झाले आहे. त्यामुळे व्यतिगत लेखन, कविता, अशा माध्यमातून मुले खूप कमी प्रमाणात व्यक्त होताना दिसतात.
हे लक्षात ठेवून *दि एज्युकेशन सोसायटी, अंबरनाथ, संचालित* *पंचकोशाधारित गुरुकुल ,* ने मुद्दाम यावेळी व्यक्तीपरिचयासाठी *बाल साहित्य लेखक,कवी* असलेल्या व्यक्तीला आमंत्रित केले होते. *बुधवार ,दिनांक 5 ऑगस्ट* रोजी पार पडलेल्या या सुसंवाद कार्यक्रमात इयत्ता 5 वी ते 8 वी च्या विद्यार्थ्यांसमोर,
लेखन प्रक्रिया नेमकी कशी असते.?मनातले भाव कागदावर कसे उतरतात? यासाठी काय वाचायला हवे.. अशा विविध मुद्द्यावर भावे सरांनी चर्चा केली.
चांगला लेखक होण्यासाठी चांगला वाचक, चांगला श्रोता होणे गरजेचे आहे, यावर त्यांनी भर दिला. रोज काहीतरी वाचायला हवं, लिहायला हवं,असा आग्रह त्यांनी केला.
त्यांनी विचारलेल्या प्रश्नांना ज्यांनी योग्य, समर्पक उत्तरे दिली त्यांना त्यांनी स्वतः लिहिलेली दोन पुस्तके भेट दिली.
भावे सरांनी केलेल्या नर्मदा परिक्रमेविषयी देखील मुलांना माहिती दिली.
गुरुकुल प्रमुख अश्विनी ताईंनी भावे सरांचे स्वागत आणि आभार मानले.. आणि कार्यक्रमाची सांगता झाली.
🌸💐🌸💐🌸💐🌸💐

क्षेत्र भेट इयत्ता 6 वी , गणपती कारखानामंडळी ,गणेशोत्सव हा आपल्या संस्कृती चा अविभाज्य भाग आहे. गणरायाच्या प्रसन्न मूर्त...
04/08/2026

क्षेत्र भेट इयत्ता 6 वी , गणपती कारखाना
मंडळी ,
गणेशोत्सव हा आपल्या संस्कृती चा अविभाज्य भाग आहे. गणरायाच्या प्रसन्न मूर्ती ची स्थापना करून हा उत्सव आपण साजरा करतो.
या गणपती च्या मूर्ती कशा बनवल्या जातात, त्यामागचे तंत्र, मूर्ती बनवण्याची पद्धती या गोष्टी प्रत्यक्ष बघण्यासाठी, इयत्ता 6 वी ची क्षेत्रभेट शनिवार दिनांक 1 ऑगस्ट रोजी,नेवाळी गावातील गणपती कारखान्यात गेली होती.
नेवाळी गावातील सगळ्यात जुना असलेल्या या कारखान्यात काम करणाऱ्या पाटील बंधूनी मुलांना छान माहिती दिली.
शाडू च्या माती पासून मूर्ती बनवताना मुले अगदी रंगून गेली होती. दादांनी pop ( प्लास्टर ऑफ पॅरिस ) आणि शाडूच्या मूर्ती मधला फरक, फायदे तोटे मुलांना समजावून सांगितले.
*कोळ्याच्या पोशाखात असलेला गणपती, लालबाग चा राजा, दगडूशेठ, शंकर पार्वती अशा विविध रूपातील गणपती पाहून मुले अगदी हरखून गेली*...
मूर्ती बनवणे, त्यातील बारकावे दाखवणे, सुकल्यावर, रंगकाम करणे, असे कामाचे टप्पे मुलांनी सविस्तर समजून घेतले.
निघताना आपल्या घरातील गणपती मातीपासून बनवलेले असतील असं मनाशी पक्के ठरवून मुले कारखान्यातून निघाली.
जवळच असलेल्या प्रियल पाटील या विद्यार्थिनी च्या घरी अल्पोपहाराचा आस्वाद घेऊन मुले शाळेत परत आली.
6 वी मधील 26 मुले आणि मनिषा ताई सोबत विक्रम आर्य .. असे सर्वजण या क्षेत्र भेटीत सहभागी झाले.
#मराठीभाषा #गुरुकुल

04/08/2026
03/08/2026

🌨️वर्षा सहल इयत्ता ५वी आणि ७वी🌧️

गुरुवार दिनांक ३० जुलै रोजी इयत्ता ५वी आणि ७वी ची एकूण ५८ विद्यार्थी यांची वर्षा सहल बदलापूर पनवेल हायवे येथे असलेल्या धबधब्यावर नियोजित केली होती.. 🌦️🌨️
परंतु दोन-तीन दिवस पावसाने सुट्टी घेतल्यामुळे तेथे अजिबातच भिजण्या योग्य पाणी नव्हते...
त्यामुळे सुरुवातीला मुलांचा थोडासा हिरमोड झाला... परंतु सगळ्या शिक्षकांच्या चर्चेअंती आनंद नगर एमआयडीसी येथे असलेल्या धबधब्यावर मुलांना नेण्याचे ठरले..

ट्रेकिंग करून🧗🏼‍♂️🧗‍♀️ दमलेल्या मुलांनी एमआयडीसी मधील धबधब्याचा मनमुराद आनंद लूटला....
मुलांचा आनंद बघून वरुण राजाने देखील हजेरी लावली...🌧️🌨️
पावसातच मुलांनी वडापावचा देखील आनंद घेतला...
एकूणातच ही वर्षा सहल मुलांमध्ये एकी,सहकार्य भाव,संयम, शिस्त या गुणांची जाणीव करून देणारी ठरली...

मुलांच्या या आनंदामध्ये आदिती ताई,विक्रम आर्य, संदेश दादा, वर्षाताई आणि शिवम आर्य हे शिक्षक देखील सहभागी होते....

दुपारी ४च्या सुमारास पुन्हा परतीच्या प्रवासासाठी निघालो.. आणि सर्व मुले सुखरूप शाळेमध्ये पोहोचली..

03/08/2026

✨ पंचकोशाधारित गुरुकुल - भीमाशंकर वर्षा सहल व ट्रेक २०२६! 🌧️⛰️🎒

नमस्कार पालक व विद्यार्थी मित्रांनो 🙏😊
दिनांक ३० आणि ३१ जुलै रोजी आपल्या गुरुकुलच्या इयत्ता ७/८/९/१० चे निवडक २६ विद्यार्थी आणि ३ शिक्षकांनी निसर्गाच्या कुशीत वसलेल्या, बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक पावन क्षेत्र असलेल्या 'श्री क्षेत्र भीमाशंकर' 🛕 येथे एक अविस्मरणीय वर्षा सहल आणि ट्रेक यशस्वीरित्या पूर्ण केला आहे! 🎉🥳
निसर्गाचा अद्भुत चमत्कार, गडद धुक्याची चादर 🌫️ आणि कोसळणारे पांढरे शुभ्र धबधबे 🌧️ अनुभवत, मुलांनी केवळ आनंदच घेतला नाही, तर 'पंचकोश' संकल्पनेवर आधारित जीवनशिक्षणाचे प्रत्यक्ष धडे गिरवले.

🌿📖या सहलीदरम्यान मुलांच्या कोशनिहाय होणाऱ्या प्रगतीचे साधारण स्वरूप: 👇
*अन्नमय कोश (शारीरिक सक्षमता)*: सह्याद्रीच्या कठीण वाटांवर ट्रेकिंग करताना मुलांचा शारीरिक स्टॅमिना, ताकद आणि लवचिकता वाढली. 💪 कष्टाच्या प्रवासासोबतच मुलांनी शुद्ध आणि सात्विक आहाराचा आस्वाद घेतला. 🥣🍎

*प्राणमय कोश (ऊर्जा आणि चैतन्य)*: डोंगरावरील शुद्ध, प्रदूषणमुक्त हवा आणि प्राणवायूमुळे (ऑक्सिजन) मुलांमध्ये एक नवीन ऊर्जा आणि उत्साह संचारला. 🌬️ शरीरातील सुस्ती पळून जाऊन चैतन्य निर्माण झाले. ⚡🔋

*मनोमय कोश (मानसिक आनंद व एकाग्रता)*: धुक्याची दुलई आणि धबधब्यांचे मंजूळ संगीत ऐकून मुलांचे मन प्रफुल्लित झाले. 🎼 मोबाईलच्या आभासी जगातून बाहेर पडून त्यांनी खरा, निखळ आनंद अनुभवला. 🧠💚

*विज्ञानमय कोश (बुद्धी आणि निर्णयक्षमता)*: कठीण वाटेवर पाऊल टाकताना अचूक निर्णय घेणे, निसर्गाचे बारकाईने निरीक्षण करणे आणि एकमेकांना हात देऊन पुढे जाणे, यामुळे मुलांची बुद्धी आणि विवेक जागृत झाला. 🗺️🧐

*आनंदमय कोश (आत्मिक सुख आणि समाधान)*: भीमाशंकर ज्योतिर्लिंगाचे भावपूर्ण दर्शन 🛕 आणि निसर्गाशी एकरूप झाल्यावर मुलांच्या चेहऱ्यावर जे निखळ समाधान आणि हसू ओसंडून वाहत होते, तोच या सहलीचा खरा आत्मा होता! 🥰✨

याशिवाय गुप्त भीमाशंकरला सुद्धा भेट देऊन निसर्गाची किमया पाहिली🤩🤩शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली मुलांनी स्वयंशिस्त, नेतृत्वगुण आणि संघभावना (Teamwork) यांचे अप्रतिम सादरीकरण केले. 🤝🎓 हा निसर्गाचा खुला वर्ग आमच्या विद्यार्थ्यांसाठी आयुष्यभराचा अनमोल ठेवा ठरेल! 🎒🌲
सर्व सहभागी विद्यार्थ्यांचे आणि त्यांना सुरक्षितपणे मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे मनःपूर्वक कौतुक व अभिनंदन! 👏
विशेष आभार सर्व पालकांचे, ज्यांनी गुरुकुलवर विश्वास दाखवून हा ट्रेक यशस्वी करण्यात हातभार lavlaa. 🙏💐

वर्षासहल - इयत्ता 7,8आणि 9 मुलीपावसाचा आणि  निसर्गाचा मनमुराद आनंद घेण्यासाठी इयत्ता 7,8 ,9 वीच्या 26 मुली ,3 शिक्षक अश्...
01/08/2026

वर्षासहल - इयत्ता 7,8आणि 9 मुली

पावसाचा आणि निसर्गाचा मनमुराद आनंद घेण्यासाठी इयत्ता 7,8 ,9 वीच्या 26 मुली ,3 शिक्षक अश्विनीताई , वावळे आर्य,साक्षी ताई तसेच एक माजी विद्यार्थी हर्ष गुरव नेरळ येथील टपाल वाडी येथे गेले होते.
वर ढगांचा दाट पडदा,☁️🌨️ आजूबाजूला भरपूर हिरवाई 🌱🌿🌾, मधून मधून येणारा पाऊस,🌨️🌧️ सुरक्षित धबधबा आणि मैत्रिणींची साथ 💃👭या सगळ्यांचा मुलींनी भरपूर आनंद घेतला.
थोडे ट्रेकिंग, थोडा निसर्गाचा अभ्यास🪿🐥🐌🐛🐐🐕🍁🍃🎋, चालताना एकमेकांची काळजी आणि सहकार्य , एकमेकांचे डबे वाटून खाणे 😊याचा अनुभव मुलींना घेता आला.
ही केवळ सहल नसून यातून देखील पंचकोश विकसित करण्याचा प्रयत्न केला जातो हेच या सहलीचे वैशिष्ट्य
🙏🌸💐

01/08/2026

⛈️ वर्षा सहल⛈️

वनलक्ष्मी वांगणी

दिनांक ३० जुलै, २०२६ या दिवशी सकाळी साडेनऊ वाजता इयत्ता सहावी तसंच काही निवडक आठवीचे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी असे शाळेतून बस ने वनलक्ष्मी, वांगणी येथे रवाना झालो... 🚌

ठरलेल्या ठिकाणी सकाळी १०.३० वाजता आम्ही पोहोचलो. त्यानंतर जवळ जवळ १२.३० पर्यंत सगळी मुलं आणि मुली धबधब्याखाली मनसोक्त खेळत होती, भिजत होती, डुंबत होती...

साधारण १२.३० - १ च्या दरम्यान मुलांच्या पोटात कावळे ओरडू लागले, 😃 तसतसे एक एक जण पाण्याच्या बाहेर येऊ लागले...

मग मुलांनी फ्रेश होऊन आपापले जेवणाचे डबे उघडले, आणि जेवणाचा आनंद घेऊ लागले.. 🍱🍝🥪🥘🫓

मग साधारण २.३० वाजता आम्ही तिथून शाळेकडे यायला रवाना झालो..🚌

एकंदरीत वर्षा सहलीचा, पाण्यात मनसोक्त डुंबण्याचा आनंद सगळ्या मुलांनी घेतला.. सगळे विद्यार्थी सुखरूप शाळेत पोहोचले...

ह्या आनंदात मुलांबरोबर गुरुकुलचे शिक्षक अजित दादा, धनश्री ताई, मनिषा ताई आणि सचिन आर्य हे सुद्धा सहभागी झाले होते...

🌿📚 💐 कालिदास दिन उत्साहात संपन्न! 💐 📚🌿🗓️ दि. १५ जुलै २०२६ रोजी आपल्या 🌼 पंचकोशाधारित गुरुकुलात 🌼 कालिदास दिन अत्यंत उत्स...
24/07/2026

🌿📚 💐 कालिदास दिन उत्साहात संपन्न! 💐 📚🌿

🗓️ दि. १५ जुलै २०२६ रोजी आपल्या 🌼 पंचकोशाधारित गुरुकुलात 🌼 कालिदास दिन अत्यंत उत्साहात आणि आनंदमय वातावरणात साजरा करण्यात आला.

🌱 गुरुकुलात विविध उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासोबतच त्यांच्या कलागुणांना वाव दिला जातो. अशाच एका सुंदर उपक्रमातून विद्यार्थ्यांनी महाकवी कालिदास यांच्या साहित्याचा परिचय करून दिला.

☁️ आषाढ मासारंभ कालिदास दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी महाकवी कालिदासांनी 'मेघदूत' या अमर खंडकाव्याची निर्मिती केल्याचे मानले जाते. या निमित्ताने विद्यार्थ्यांना मेघदूत तसेच कालिदासांच्या इतर काव्य व नाटकांची ओळख करून देणे हा या कार्यक्रमामागील मुख्य उद्देश होता.

🎓 यावर्षी इयत्ता ७ वी च्या विद्यार्थ्यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे अतिशय सुंदर, शिस्तबद्ध आणि नियोजनबद्ध सादरीकरण केले.

🪔 कार्यक्रमाची सुरुवात सौ. अश्विनी ताई यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने आणि संस्कार याने सादर केलेल्या दीपमंत्राने झाली.

✨ कार्यक्रमातील आकर्षणे:
🔸 🎤 श्रद्धा – कार्यक्रमाचे सुंदर नियोजन व सूत्रसंचालन
🔸 📖 गौरी – कालिदासांची कथा संस्कृतमधून सादर केली
🔸 🗣️ हिमांशू – त्याच कथेचे मराठीतून प्रभावी कथन केले
🔸 📚 संस्कार – महाकवी कालिदासांची माहिती सांगितली
🔸 🎶 कालिदासांवरील संस्कृत गीताचे सुमधुर सादरीकरण
🔸 🎭 विद्यार्थ्यांनी सादर केलेले कथानाट्य
🔸 ❓📚 संस्कृत प्रश्नमंजुषेद्वारे सर्वांनी आनंद घेतला

🕉️ कार्यक्रमाची सांगता शांतिमंत्राने करण्यात आली. 🎵 संगीत व शांतिमंत्रासाठी छंद वर्ग शिक्षकांचे मोलाचे सहकार्य लाभले.

🙏 अशा प्रकारे ज्ञान, संस्कार, कला आणि आनंद यांचा सुंदर संगम घडवणारा कालिदास दिन लघुरूपात पण अत्यंत अर्थपूर्ण पद्धतीने संपन्न झाला.

🌸 विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागाबद्दल आणि सर्व शिक्षकांच्या सहकार्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन व आभार! 🌸

24/07/2026

"*सकाळच्या पारी हरीनाम बोला*..., *वासुदेव आला, हो वासुदेव आला* ...!!"

डोक्यावर मोरपिसांची टोपी कपाळाला गंध.. गळ्यात माळा.. हातात चिपळ्या आणि झांज वाजवत वासुदेव आला.... अहो कुठे म्हणजे काय..? चक्क आपल्या गुरुकुलामधे अवतरला... पाऊस असूनही छत्री न घेता भिजून चिंब झालेला तरीही चेहऱ्यावर प्रसन्न हास्य ठेवून मुलांशी संवाद साधायला वासुदेव आला..
खरंतर
वासुदेव, डोंबारी, गारुडी , पाथरवट, पिंगळे
असे शब्द, आणि हा व्यवसाय करणारी मंडळी *समाजातून नामशेष होतं चालली* *आहेत*.. एकेकाळी आपल्या संस्कृतीचा अविभाज्य भाग असणारी ही मंडळी काळाच्या ओघात नाहीशी होतं चालली आहेत.
पण *मानवी पंचकोशा* च्या विकासाशी संबंधित असणारा हा सांस्कृतिक कला प्रकार विदयार्थ्यांना कळवा, बघता यावा करिता एका *पारंपरिक वेशातील वासुदेवाला शाळेत आमंत्रित करण्यात आले होते*.
इयत्ता पहिली ते दहावी अशा सर्व इयत्ता आणि वयोगट असलेल्या विद्यार्थ्यांना या भेटीचा आनंद घेता आला. आपल्या पहाडी आवाजात वासुदेवाने म्हटलेले अभंग, नामगजर भारावून टाकणारा होता. गायनासोबतच विद्यार्थ्यांना चांगल्या सवयीचे महत्व, अभ्यासाचे महत्व सांगण्यास वासुदेव विसरला नाही.
विशेष म्हणजे विद्यार्थ्यानी देखील वासुदेवाला प्रश्न विचारले. त्यांना समर्पक उत्तरे देताना शेवटी ही कला माझ्यानंतर कोण पुढे नेईल??? अशी खंत देखील व्यक्त केली.
*गुरुकुल प्रमुख अश्विनीताई*, *व्यवस्थापक विवेक आर्य* यांचे आभार मानून वासुदेवाने सगळ्यांचा निरोप घेतला.
काळाच्या ओघात *नाहीशा होत चाललेल्या परंतु सांस्कृतिक मूल्य असलेल्या सर्व गोष्टी*, *कला जपण्याचं,कठीण पण महत्वाचं काम पंचकोशाधारित गुरुकुल वेळोवेळी करत असते*.परंतु ही एक सामाजिक जबाबदारी देखील आहे.. आपण सर्व सुजाण पालक वर्ग हे सर्व जाणताच.
आपण सर्व जण मिळून हे असे प्रयत्न चालू ठेवूया...
"*रामकृष्ण हरी*"

Address

Bhausaheb Paranjape Vidyalay, Kansai Vibhag
Ambarnath
421501

Opening Hours

Monday 7am - 7pm
Tuesday 7am - 7pm
Wednesday 7am - 7pm
Thursday 7am - 7pm
Friday 7am - 7pm
Saturday 7am - 7pm

Telephone

+918668971589

Alerts

Be the first to know and let us send you an email when पंचकोशाधारित गुरुकुल अर्थात 12 तासांची शाळा posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The School

Send a message to पंचकोशाधारित गुरुकुल अर्थात 12 तासांची शाळा:

Shortcuts

Share

Category