08/03/2021
स्त्रीच्या सर्जनत्वाचा आणि सृजनशीलतेचा, प्रतिकूलतेवर मात करून सातत्याने लढत राहण्याच्या तिच्यातील दुर्दम्य इच्छाशक्तीचा, यशाची शिखरे पादाक्रांत करण्याच्या तिच्या साहसी वृत्तीचा, तिच्यात जागृत झालेल्या आत्मभानाचा व आत्मसन्मानाचा आज जागतिक महिला दिनानिमित्त गौरव करूया! त्यांचे हक्क, अधिकार, संरक्षण, समान संधी आणि सबलीकरणासाठी सुरू असलेले कार्य आणि प्रयत्न कायम राहतील हा निर्धार व्यक्त करतो.