18/09/2023
*जिल्हास्तरीय थ्रो बाॅल स्पर्धेत कै. अनुसयाबाई गोरटे कनिष्ठ महाविद्यालयाचा संघ प्रथम*
महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा विभाग अंतर्गत जिल्हास्तरीय थ्रो बाॅल खेळाचे भव्य आयोजन अहमदपुर येथील अहिल्याबाई होळकर माध्यमिक विद्यालयाच्या प्रांगणात आयोजित करण्यात आलेले होते या स्पर्धेत जिल्ह्याभरातुन अनेक संघ सहभागी झाले होते अंतिम अटीतटीच्या लढतीत कै. अनुसयाबाई गोरटे कनिष्ठ महाविद्यालय तुळशीराम तांडा या संघाने महात्मा फुले कनिष्ठ महाविद्यालय, किनगाव या संघाचा १० गुणांनी पराभव करून लातूर जिल्ह्यात याहि वर्षी प्रथम क्रमांक मिळविला. सर्व यशस्वी खेळाडूंचे अभिनंदन संस्था अध्यक्ष मा.श्री.सुधिर गोरटे,कोषाध्यक्ष श्री.पुंडलिक गोरटे, जेष्ठ मार्गदर्शक व शिवछ्त्रपती पुरस्कार विजेते प्रा. दत्ताभाऊ गलाले, थ्रो बाॅल खेळाचे मार्गदर्शक श्री. बालाजी कोटलवार सर,मुख्याध्यापक. प्रशांत माने, प्रा.जाधव डी.बी, जाधव के.जी,आमीन शेख,सुशांत राजुरकर, बंडु नवटक्के,काशीम शेख,सुदर्शन बेंबडे, इत्यादींनी केले, याप्रसंगी थ्रो बाॅलप्रेमी खेळाडु व नागरिकांची उपस्थिती होती.