10/06/2021
Tribute Ride in Memory of King of Ghats Kamalakar Zende Sir*
अनेक सायकल शर्यती जिंकणारे, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय सायकलपटू घडविणारे ज्येष्ठ मार्गदर्शक, क्रीडा संघटक आणि 'घाटाचा राजा' म्हणून प्रसिद्ध असलेले कमलाकर झेंडे.
महाराष्ट्रात मुंबई-पुणे ही सायकल शर्यत अनेक वर्षे सुरू आहे. दीर्घ पल्ल्याची (१५३ किलोमीटर) व अवघड घाटवळणांची ही शर्यत लोकप्रिय आहे. घाटाचे अंतर कमीत कमी वेळात सर्वप्रथम पार करणाऱ्या स्पर्धकाला 'घाटाचा राजा' हा मानाचा किताबही दिला जातो. झेंडे यांनी मुंबई-पुणे सायकल शर्यत हॅटट्रिकसह चार वेळा (१९७५, १९८०, १९८१, १९८२) जिंकली होती. या काळात त्यांनी मुंबई-पुणे सायकल शर्यतीत आपला दबदबा राखला होता. सायकलिंगमधील अनेकांचे ते 'हिरो' होते. त्यांनी १९८१मधील मुंबई-नाशिक ही राष्ट्रीय सायकल शर्यतही जिंकली होती. तसेच, त्रिवेंद्रम येथे झालेल्या राष्ट्रीय रोड सायकलिंग अजिंक्यपद स्पर्धेत त्यांनी सुवर्णपदक मिळविले होते. यानंतर त्यांनी प्रशिक्षक म्हणून आपल्या कामाला सुरुवात केली, तर पुणे-लोणावळा, पुणे-मुंबई, पुणे-नगर अशा अनेक सायकल शर्यतींचे यशस्वी आयोजनही केले. त्यांना प्रतिष्ठेचे शिवछत्रपती पुरस्कार (१९७६-७७) आणि दादोजी कोंडदेव पुरस्कारानेही (२००२-०३) गौरविण्यात आले होते. म्हाळुंगे-बालेवाडी येथील क्रीडा प्रबोधिनीत ते १९९६ ते २००५ पासून सायकलिंग प्रशिक्षक म्हणूनही कार्यरत होते. या दरम्यान त्यांच्या तालमीमध्ये अनेक खेळाडुंनी सायकलिंग मध्ये विविध आंतरराष्ट्रीय पातळीवर यश संपादन केले. यास्तव त्यांना उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक हा पुरस्कारही प्राप्त झाला. उत्कृष्ट क्रीडा संघटक म्हणूनही त्यांनी आपली ओळख निर्माण केली होती. पुणे जिल्हा सायकलिंग असोसिएशनचे ते संस्थापक सचिव होते. साधारण २५ वर्षे ते या पदावर कार्यरत होते. राज्य सायकलिंग संघटनेचे काही काळ ते अध्यक्षही होते. त्याचबरोबर भारतीय सायकलिंग संघटनेचे ते चार वर्षे उपाध्यक्ष होते.
सायकलिंग मध्ये आपले संपुर्ण जीवन वाहुन घेतलेले व्यक्तीमत्त्व म्हणुन झेंडे सरांकडे बघितले जात असे, अशा या व्यक्तीमत्त्वास सायकलिंग द्वारे अभिवादन करणे योग्य होईल,
तीनही लिंक याठिकाणी उपलब्ध करून देण्यात येत आहेत...
1) गुगल फॅार्म लिंक - https://forms.gle/jWyBy1VL9gEdsk4V6
2) Strava ग्रुप लिंक - https://www.strava.com/clubs/939261
3) Strava राईड ईव्हेंट लिंक - https://www.strava.com/clubs/939261/group_events/961610