
संधिनिकेतन अपंगांची कर्मशाळा तथा निजबल शिक्षा निकेतन मधील रक्षाबंधन.....
A holistic rehabilitation center for people with disabilities is established at Sandhiniketan vocati
A holistic rehabilitation centre for people with disabilities is established at Sandhiniketan vocational training centre (SNVT), at Village Anandwan, the headquarters of Maharogi Sewa Samiti, Warora, located in Chandrapur district of Maharashtra state of India. This centre will focus on empowerment of people with disabilities, with special focus on vocational, psychosocial and economic empowerment
Operating as usual
संधिनिकेतन अपंगांची कर्मशाळा तथा निजबल शिक्षा निकेतन मधील रक्षाबंधन.....
प्रवेश प्रक्रिया सुरू......
आनंदवनातील दिव्यांग मुलांनी १०० टक्के निकालाची परंपरा कायम राखली.
महारोगी सेवा समिती वरोरा संचालित निजबल अंतर्गत संधिनिकेतन अपंगांची कर्मशाळा, आनंदवन येथे दिव्यांग व्यक्तींना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी गेल्या तीन दशकाहून अधिक कालावधी पासून बोर्डाच्या खाजगी विद्यार्थी परीक्षा योजने अंतर्गत (१७ नं. फॉर्म) दिव्यांग विद्यार्थ्यांना दहावी परीक्षेला बसविले जाते. सदर विद्यार्थ्यांना विनामूल्य निवासी सुविधेसह नियमित शिकवणी वर्ग ही घेतले जाते. यावर्षी इयत्ता दहावी परीक्षेला २५ कर्णबधिर , ८ अंध व १ अस्थिव्यंग असे एकूण ३४ दिव्यांग विद्यार्थी परीक्षेला बसले होते.
सर्व विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन करीत १०० टक्के निकालाची परंपरा कायम राखली .परीक्षेला बसलेल्या ३४ पैकी २९ विद्यार्थी प्रथम श्रेणीत तर ५ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले. यात कु. प्राची कोंडस्कर या कर्णबधिर विद्यार्थिनीने ७२.४० टक्के गुण मिळवित प्रथम स्थान पटकावले तर कु. विधी डोंगरकर या अंध विद्यार्थिनीने ६३.४० टक्के गुण मिळवित अंध प्रवर्गात प्रथम क्रमांक घेतला. तर एकमेव अस्थिव्यंग कु. सुप्रिया शेंडे हिला ६५.२० टक्के गुण संपादन केले.
व्यवस्थापकीय अधीक्षक श्री. रवींद्र नलगिंटवार यांच्या मार्गदर्शनात राबविण्यात येणाऱ्या या शैक्षणिक प्रकल्पात उपक्रम समन्वयक व विशेष शिक्षक श्री. इक्राम पटेल, श्री गणेश जायनाकर, श्री. रमेश बोपचे, श्री आशीष येटे , श्री. सौरव वानखेडे (कर्णबधिर शिक्षक) या शिक्षकांसोबत श्री. विजय भसारकर, मुख्याध्यापक,आनंद मूकबधिर विद्यालय, विशेष शिक्षक श्री उमेश घुलक्षे, श्री. प्रशांत गवई, कला शिक्षक यांनी विशेष मेहनत घेतली.
अंध विद्यार्थ्यांचे लेखनिक म्हणून आनंद माध्यमिक विद्यालय ,आनंदवन व लोकमान्य विद्यालय, वरोरा येथील अनुक्रमे नववी व सहावी चे विद्यार्थ्यांनी सहकार्य केले. परीक्षा व पूर्व तयारी करीता श्री. राखे सर, मुख्याध्यापक लोकमान्य विद्यालय, वरोरा यांचे सह शाळेतील शिक्षकांचे व कर्मचाऱ्यांचे बहुमूल्य योगदान व मार्गदर्शन प्राप्त झाले. सदर यशा करीता संस्थेचे सचिव व मुख्य कार्यकारी अधिकारी, डॉ. विकास आमटे, डॉ. भारती आमटे, कार्यकारी विश्वस्त श्री. कौस्तुभ आमटे, संस्थंतर्गत व्यवस्थापिका सौ. पल्लवी आमटे, डॉ. विजय पोळ,विश्वस्त, श्री. सुधाकर कडू , श्री. सदाशिव ताजने, श्री.माधव कवीश्वर यादी मान्यवरांसह आनंदवन वासियांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे व शिक्षकाचे अभिनंदन केले.. तसेच पुढील वाटचाली करीता शुभेच्छा दिल्या.💐💐
वर्ग १२ वी च्या सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे मनःपुर्वक हार्दिक अभिनंदन.
_महारोगी सेवा समिती, वरोरा द्वारा आयोजित_
*'आन्तर भारती - भारत जोडो श्रमसंस्कार छावणी'त कर्णबधिर युवांना सहभागाचे जाहीर आवाहन*
_अधिक माहिती करिता :_
https://www.shramsanskar.maharogisewasamiti.org/