Sec. & Higher Sec. School, Shendi

Sec. & Higher Sec. School, Shendi

Share

Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Sec. & Higher Sec. School, Shendi, Education, Sec. & Higher Sec School, Shendi.

Google Forms - create and analyze surveys, for free. 21/10/2021

प्रिय माजी विद्यार्थी व विद्यार्थिनी,
सर्वांना नमस्ते 🙏
या पोस्ट मध्ये एक गुगल फॉर्म शेअर करत आहे. त्यामध्ये आपली माहिती भरावी ही विनंती. यामुळे आपणासोबत पुन्हा जोडलं जाण्याची संधी निर्माण होईल. तसेच आपण नागरिक म्हणून आज कोणत्या भूमिकेत आहात हे जाणून घेता येईल.
कृपया हा संदेश आपल्या संपर्कातील सर्व माजी विद्यार्थ्यांना पाठवा.🙏

Google Forms - create and analyze surveys, for free. Create a new survey on your own or with others at the same time. Choose from a variety of survey types and analyze results in Google Forms. Free from Google.

01/10/2017

Congratulations ..... Jalindar and Vinit....

05/09/2015

उच्च माध्यमिक विद्यालय, शेंडी येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा.....

आज ५ सप्टेंबर डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस. संपूर्ण देशात हा दिवस "शिक्षक दिन" म्हणून साजरा केला जातो. एक वेगळच चित्र या दिवशी शाळा-कॉलेजांमध्ये बघायला मिळते. विद्यार्थ्यांमध्ये एक उत्साहाचे वातावरण या दिवशी दिसते. अनेक विद्यार्थी उत्स्फुर्तपणे व आवडीने या दिवशी शालेय प्रशासनातील प्राचार्य, पर्यवेक्षक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या भूमिका नेटाने पार पडताना दिसतात. सर्व नियोजन हे एक दिवसाचे विद्यार्थी शिक्षक व प्राचार्य करत असतात व संपूर्ण दिनक्रम अगदी व्यवस्थित पार पडत असतात.
माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, शेंडी (भंडारदरा) या विद्यालयातील उच्च माध्यमिक विभागात देखील दरवर्षी उत्साहात शिक्षक दिन पार पडतो. आजही मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी यात भाग घेतला. सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा जाधव के. व्ही. यांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय व्यवस्थित नियोजन करून विद्यार्थ्यांनी संपूर्ण दिनक्रम अतिशय उत्साहात पार पडला. सुरुवातीस विद्यार्थ्यांनी नियोजित वेळापत्रकानुसार तासिका घेतल्या. ७ तासिका झाल्यानंतर भंडारदरा वसाहत येथील कम्युनिटी हॉल मध्ये डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाचे संपूर्ण सूत्रसंचालन डहाळे सागर व दिपक वाकचौरे या विद्यार्थ्यांनी केले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान विद्यालयाचे प्राचार्य मा. रोंगटे डी. एन. यांनी भूषविले. शेंडी गावच्या सरपंच सौ. संगीताताई भांगरे या प्रमुख पाहुण्या म्हणून लाभल्या. तसेच या कार्यक्रमाचे प्रमुख वैशिष्ट्य होते तो या कॉलेजचा माजी विद्यार्थी गोरखनाथ दामू बोऱ्हाडे. २००९ मध्ये याच विद्यालयातून इयत्ता १२वि विज्ञान वर्गातून विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण गोरख याने कॉलेज ऑफ इंजिनिअरींग पुणे येथून बी ई हि पदवी संपादन केली. आय ई एस या युपीएससी स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना त्याने इतरही स्पर्धा परीक्षा व मुलाखती दिल्या होत्या. काही ठिकाणी अपयश आले. परंतु मुळातच अभ्यासू, हुशार, नम्र, संयमी व ध्येयवादी असणाऱ्या गोरखने हार मानली नाही. प्रतिकूल परिस्थितीही निर्माण झाल्या. परंतु त्यांनाही सामोरे जात न डगमगता त्याने प्रयत्न सुरूच ठेवले आणि अखेर त्याच्या प्रयत्नांना यश मिळाले. आधी बीएमसी मध्ये निवड त्यानंतर काही दिवसांतच एमपीएससी परीक्षेत यशस्वी होवून सहा. अभियंता म्हणून निवड आणि त्यानंतर काही दिवसांतच National Mineral Development Corporation मध्ये सुद्धा सहा. अभियंता म्हणून निवड असे एका मागून एक सुखद धक्केच जणू त्याला व आम्हा शिक्षकांनाही त्याच्या या मेहनतीमुळे मिळाले. या गोरखचा सत्कार शिक्षक दिनी सर्व शिक्षकांच्या वतीने विद्यालयाचे प्राचार्य व कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी सरपंच सौ संगीताताई भांगरे यांच्या हस्ते करण्यात आला. खरे तर एखाद्या विद्यार्थ्याचा सत्कार त्याच्या शाळेत होणे यापेक्षा दुसरे कौतुक व सत्कार त्या विद्यार्थ्याच्या शिक्षकांसाठीही कुठलाच नसतो.
गोरखने सुद्धा सत्कारास उत्तर दिले व विद्यार्थ्यांना स्पर्धा व परीक्षांची तयारी याबाबत मोलाचे मार्गदर्शन केले.
प्रमुख पाहुण्यांचा सत्कार आजच्या दिवसाच्या प्राचार्य यांनी केला. त्यानंतर विद्यालयाचे प्राचार्य, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचा सत्कार आजच्या शिक्षकांनी केला. त्यानंतर विद्यार्थी शिक्षक व विद्यार्थी यांची मनोगते झाली. आजचे अनुभव व डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जीवनावर प्रकाश विदार्थी शिक्षकांनी टाकला. प्रा साबळे बी एम यांनी देखील आपल्या मनोगतात गुरुचे महत्व विषद केले. त्यानंतर प्रमुख अतिथी व अध्यक्षांचे मनोगत पार पडले. विद्यार्थ्यांनीच आभारप्रदर्शन केले व अध्यक्षांच्या परवानगीने कार्यक्रम संपला.
या कार्यक्रमाचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे शिक्षक म्हणून सहभागी झालेल्या ५१ विद्यार्थ्यांपैकी ३७ विद्यार्थिनी होत्या. मनोगत व्यक्त करण्यातही मुलींनीच जास्त सहभाग नोंदविला. हि अतिशय भूषणावह बाब आहे. परंतु दुसऱ्या बाजूस विद्यार्थी म्हणून मुलांचा सहभाग मात्र मोठी चिंतेचीच बाब एक शिक्षक म्हणून वाटते आहे.

Photos 02/04/2015

लाइक अन शेयर..!!

Photos 21/10/2014

Wish you all a Eco-Friendly Diwali... ….

These kids are out to send a message this !
Will you help them spread their message?

Credits: Gurmeet Sapal

Photos 08/09/2014

महाराष्ट्र राज्य वीजनिर्मिती कंपनीमध्ये नोकरीची संधी... त्वरा करा ऑनलाइन अर्ज करण्याची तारीख आहे अगदी जवळची... पाहा आणि त्वरित अर्ज करा... नाही तर संधी निघून जाईल...
http://bit.ly/1xxmImu

Photos 26/02/2014
Photos 21/02/2014

thought for the day..........!!!

Want your school to be the top-listed School/college in Shendi?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Category

Website

Address

Sec. & Higher Sec School
Shendi
422604