and Developement
Hon. Dilip Walse Sir Hearty Thanks.
Many Many Thanks and best wishes from School.
Mahatma Gandhi Primary English Medium School, Manchar
We are the part of Rayat Shikshan Sanstha . Celebrating 100 years of imparting education to masses through various institutions.
Operating as usual
@ अविष्कार विज्ञान प्रदर्शन, College Level exhibition... Our little scientists did very well... Proud of all
महात्मा गांधी प्रायमरी इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न
दिनांक २६/०२/२०२४ रोजी महात्मा गांधी प्रायमरी इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम उत्साहात सादर करण्यात आला. स्नेह स्नेहसंमेलनाची संकल्पना ही मराठी लोकगीतांवर आधारित होती. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माननीय रामेश्वर घोंघडे-मिनी मा. मनोज जरांगे पाटील (चित्रपट मराठा योद्धा ),माननीय रवींद्र ठाकूर (अभिनेता मॉडेल), माननीय तुकाराम कळसाईतकर (चित्रपट छापा काटा), माननीय सविता माळी (आंबेगाव पंचायत समिती), माननीय गोविंद जाधव (मुख्य कार्यकारी अधिकारी नगरपंचायत मंचर) ,अतिथी माननीय विवेक वळसे पाटील, माननीय उदयराव पाटील, माननीय राजाराम बाणखेले, माननीय देवेंद्र शहा, माननीय एडवोकेट बाळासाहेब पोखरकर, मा.चैत्राली मोरे मॅडम, माननीय शिल्पा खुडे मॅडम, प्राध्यापक सुहास खेडकर सर, रयत शिक्षण संस्थेच्या पश्चिम विभागाचे इनस्पेक्टर रत्नपारखी सर, महात्मा गांधी विद्यालयाचे प्राचार्य मा.उत्तम आवारी सर,माननीय दत्ता शेठ थोरात, माननीय निलेश थोरात, माननीय कडू सर उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलाने झाली व कलेची देवता नटराज, विद्येची देवता सरस्वती व कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांनी केले नंतर मान्यवरांचे व शाळेसाठी देणगी देण्यात आलेल्या पालकांचे स्वागत व सत्कार शाळेच्या प्राचार्या सलमा शेख मॅडम व महात्मा गांधी विद्यालयाचे प्राचार्य उत्तमराव आवारी सर यांनी केला. शाळेचा वार्षिक अहवाल वाचन प्राचार्या सलमा शेख मॅडम यांनी केला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे विवेक दादा वळसे पाटील यांनी विद्यार्थ्यांना कार्यक्रमासाठी शुभेच्छा दिल्या व शाळेला वेळोवेळी मदत करण्याचे आश्वासन दिले . चित्रपट छापा काट्याचे कलाकार माननीय तुकाराम कळसाईतकर यांनी मुलांना मार्गदर्शन केले. माननीय रवींद्र ठाकूर (अभिनेता मॉडेल) यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले .नंतर शाळेच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देऊन सत्कार करण्यात आला.२०२२ - २३ मध्ये प्रथम आलेली शाळेची विद्यार्थिनी भूमी फुलसुंदर हिला पारितोषिक देऊन गौरविण्यात आले . तसेच शाळेमध्ये झालेल्या विज्ञान प्रदर्शनामध्ये प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांक आलेल्या आदेश निघोट, सुरज यादव, रुपेंद्र निषाद, सन्मेष निघोट, हर्षल टाव्हरे, मयुरेश बाणखेले, शर्वरी मोहरे या विद्यार्थ्यांना बक्षीस देण्यात आले . तसेच रेड हाऊसला विजेता म्हणून घोषित करण्यात आले. रेड हाऊसचे टीचर व हाऊस मास्टर यांना ट्रॉफी देण्यात आली त्यानंतर विविध कलागुणदर्शनाचा कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाची सु रुवात इयत्ता नववीच्या मुला मुलींनी गणेश वंदनाने केली. नर्सरीच्या व ज्युनिअर केजीच्या विद्यार्थ्यांनी इतनीसी हंसी इतनीसी खुशी व बादल बरसा .सिनीअर केजी मेरी भूक का इलाज कुकड कू.... . इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांनी भारत का बच्चा बच्चा श्रीराम बोलेगा व ईद मुबारक. इयत्ता दुसरीच्या विद्यार्थ्यांनी आमदार झाल्या सारखं वाटतंय , केळेवाली ला घेणार का ? इयत्ता तिसरीच्या विद्यार्थ्यांनी ही पोली साजूक तुपातली व धान्य धनगर वाड्यात घुसला देव. इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांनी शिवराज्याभिषेक . इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांनी डिपांग , संत गोरा कुंभार. इयत्ता सहावीच्या विद्यार्थ्यांनी राजा मला नऊवारी साडी पाहिजे, ब्रिंग इट ऑन व इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांनी आई भवानी, बाई पण भारी देवा, कोंबडी पळाली. इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांनी नाद निनादला ये ग ये ग रखुमाई इयत्ता नववीच्या गणेश वंदना, मूकनाट्य सादर केले. तसेच इयत्ता नर्सरी जुनियर व सीनियर केजी चे विद्यार्थी व पालकांनी दिल है छोटासा छोटीसी आशा हे गीत सादर केले. लल्लाटी भंडार हे गाणे दिव्यांशा इयत्ता दुसरीचे विद्यार्थिनी व तिच्या पालकांनी सादर केले .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनीषा सोमवंशी मॅडम व सोनल पारेख मॅडम यांनी केले कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शाळेच्या प्राचार्या सलमा शेख मॅडम सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले .
Science Exhibition 2023-24
Farewell Party for SSC 2023-24 Batch
Miss Manasi Nighot
Miss Pratidnya Dhobale
Miss Priyanka Yadav
Miss Sakshi Shinde
Miss Sharwari Mohare
Miss Shreeya Bandgar
Miss Vritti Kanaskar
Mast Aditya Sandbhor
Mast Sameer Shaikh
Mast Ronak Mali
Mast Viraj Thorat
Are the GEMS
All About Yellow Day Celebration and Makar Sankranti
Ready to go💐💐💐
You All are Specially Invited 😊🙏💐
You are invited to grace the function
Today Shala Siddhi Inspection
Grateful for everything
All hard works and efforts by My staff
Karmveer Jayanti celebration
Guidance by Dr. Sonalkar sir guest of hour Hon Dilip Walse Patil Sir Chairman of Program
Inspection Day... A Quality check
Successfully completed
महात्मा गांधी स्कूल मध्ये आज इन्वेस्टीचर्स सेरेमनी (INSTALLATION CEREMONY) कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमादरम्यान प्रमुख पाहुणे म्हणून रोटरी क्लब मंचर चे सध्याचे अध्यक्ष श्री. प्रशांत भिवसेन बागल यांनी मुलांना मार्गदर्शन केले. त्यांनी मार्गदर्शनात मुलांना भरपूर खेळा भरपूर, अभ्यास करा व मोबाईल वापरू नका असा संदेश दिला.
माजी सैनिक श्री.झगडे सर यांनी मुलांना खेळाचे महत्व आपल्या भाषणातून सांगितले.
शाळेचे कमिटी सदस्य प्रा. श्री. सुहास खेडकर सर यांनी मुलांना भारतीय सैन्य दलाची गोष्ट सांगितली.
या कार्यक्रमात मार्च पास्ट घेण्यात आला व नंतर खेळातील कॅप्टन निवडण्यात आले. शाळेचा हेड बॉय म्हणून कु. विराज थोरात व हेडगर्ल म्हणून कु. मानसी निघोट यांची निवड करण्यात आली.
ब्लू हाऊस कॅप्टन कु. आदित्य निघोट व कु. नेहा ठाकूर यांची निवड करण्यात आली.
हिरवा हाऊस कॅप्टन अकमल अली सय्यद व समीक्षा कवठे यांची निवड करण्यात आली. लाल हाऊस कॅप्टन सार्थक चांडोले व आर्या अमुंडकर यांची निवड करण्यात आली पिवळा हाऊस कॅप्टन सुजल गांजाळे व सिद्धी फलके यांची निवड करण्यात आली.
या कार्यक्रमाला शाळेचे चेअरमन माननीय श्री. भगवानराव मल्हारराव बेंडे पाटील यांनी शुभेच्छा दिल्या. तसेच रोटेरियन ऍड बाळासाहेब पोखरकर व रोटेरियन जयश शिंदे उपस्थित होते स्थानिक स्कूल कमिटी सदस्या डॉक्टर चैत्राली मोरे व सौ. शिल्पा खुडे उपस्थित होते. पालक प्रतिनिधी छाया मोहरे, संतोष अरगडे व स्वाती घोगरे उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन शाळेच्या मुख्याध्यापिका सलमा शेख मैडम यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आसीया शेख यांनी केले व कार्यक्रमानंतर सर्व प्रमुख पाहुणे व शिक्षक वृंद व विद्यार्थ्यांचे आभार क्रीडा शिक्षक कु .सुप्रिया सरोदे यांनी केले.
Another Remarkable Step into an academic year
Parent Teacher Association ( P.T.A.) formation...and Felicitation..
All elected PTA members shown their eminent presence for the 1st meeting..Over All a good start.
Celebration of Ashadhi Ekadashi Dindi Sohala in Campus..
Happy Faces
Holy Joys
Noted Remarkables.
Thank You Mr Vilas Shete sir
*मंचर : महात्मा गांधी प्रायमरी इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये आनंद मेळाव्याचे आयोजन .*
महात्मा गांधी महात्मा प्रायमरी इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये विद्यार्थ्यांना व्यावहारिक ज्ञान मिळावे यासाठी शनिवार दिनांक १ एप्रिल २०२३ या दिवशी आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते शालेय शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांना व्यावहारिक ज्ञान आत्मसात होण्यासाठी शाळेच्या परिसरामध्ये आनंद बाजाराचे आयोजन करण्यात आले होते ज्यामध्ये शाळेतील इयत्ता पहिली ते नववीच्या साडेतीनशे विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला यावेळी विद्यार्थ्यांनी दैनंदिन लागणाऱ्या पालेभाज्या, फळे, शीतपेय, आईस्क्रीम, शालोपयोगी वस्तू, विविध खाद्यपदार्थांची दुकाने थाटली होती शाळेचे मैदान नवव्यवसायिकांच्या आवाजाने आणि ग्राहकांच्या गर्दीने भरून गेले होते. या आनंद मेळाव्याचे व बाजार सोहळ्याचे उद्घाटन सन्माननीय प्राचार्य उत्तम आवारी सर महात्मा गांधी विद्यालय व ज्युनियर कॉलेज यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी महात्मा गांधी विद्यालयाचे चासकर सर उपस्थित होते. शाळेच्या प्राचार्या सलमा शेख मॅडम यांनी उपस्थितांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत व सत्कार केला कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलाने झाली. यावेळेस सन्माननीय प्राचार्य उत्तम आवारी सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले शाळेच्या प्राचार्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व पालकांनी विद्यार्थ्यांच्या दुकानातून खरेदी करून चिमुकल्यांच्या व्यवहारातील चौकस चाणाक्ष बुद्धीचा अनुभव घेत त्यांना प्रोत्साहित केले.
मेळाव्यासाठी स्थानिक शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री बाळासाहेब बेंडे पाटील आणि सर्व सदस्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व शुभेच्छा दिल्या.
https://www.esakal.com/pune/pune-college-students-girls-should-not-tolerate-someone-misbehaves-rsn93
Pune : कोणी गैरवर्तन करत असल्यास मुलींनी सहन करू नये ; गार्गी काळे पाटील Pune college students Girls should not tolerate someone misbehaves माध्यमिक शाळेतील व महाविद्यालयीन विद्यार्थिनींनी आपल्या समस्या मनमोकळेपणाने आईला व शिक्षिकांना सांगाव्यात. Pune ...
वार्षिक स्नेहसंमेलन...!
महात्मा गांधी प्रायमरी इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये रंगला आदिवासी नृत्य सोहळा.
महात्मा गांधी प्रायमरी इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये दि. २५/०२/२०२३ शनिवार रोजी वार्षिक स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आले होते. यावर्षी आदिवासी कला नृत्य या संकल्पनेवर स्नेहसंमेलन कार्यक्रमाचे आयोजन केलेले होते.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून माननीय आदिनाथ थोरात अध्यक्ष रोटरी क्लब मंचर हे उपस्थित होते यावेळी स्कूल कमिटीचे चेअरमन सन्माननीय भगवानराव बेंडे पाटील , प्रोफेसर राजाराम बाणखेले जनरल बॉडी मेंबर रयत शिक्षण संस्था सातारा, मा.उदय पाटील सर , डॉ. के.जी कानडे प्राचार्य अण्णासाहेब आवटे महाविद्यालय. माननीय उत्तम आवारी प्राचार्य महात्मा गांधी विद्यालय मंचर. डॉ, चैत्राली मोरे एल. एम. सी मेंबर, मा.शिल्पा खुडे एल.एम.सी मेंबर, मा.बाळासाहेब पोखरकर एल.एम.सी मेंबर, सुहास खेडकर एल.एम.सी मेंबर, सविता माळी बी. ई .ओ आंबेगाव व मा. राहुल चिंबळकर मा.जयेश शिंदे, श्री प्रशांत बागल, इंजि. बाळासाहेब पोखरकर मा. संतोष बाणखेले मा.अवि शेटे मा. यांनी उपस्थिती नोंदवली व इतर प्रमुख पाहुणे व्यासपीठावर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलाने झाली. आलेल्या पाहुण्यांचे स्वागत व सत्कार शाळेच्या प्राचार्य सौ. सलमा शेख मॅडम यांनी केले.ज्या दानशूर व्यक्तींनी शाळेस वस्तूरुपी मदत केली त्या मान्यवरांचाही सन्मान करण्यात आला. गुणवंत विद्यार्थ्यांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले त्यासोबत इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ ही घेण्यात आला . ग्रीन हाऊस विजयी म्हणून घोषित करण्यात आला व सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सन्माननीय आदिनाथ थोरात व स्कूल कमिटी चेअरमन सन्माननीय भगवानराव बेंडे पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी कलागुणांचे सादरीकरण केले कार्यक्रमाची सुरुवात श्री गणेश वंदनाने झाली. नर्सरीच्या विद्यार्थ्यांनी मारिया पिलाशे, ज्युनिअर केजीच्या विद्यार्थ्यांनी चक धूम धूम, सिनियर केजी च्या विद्यार्थ्यांनी साउथ इंडियन सॉंग पुष्पा व छबीदार छबी पहिलीच्या मुलांनी बंगाली गाणे अरे मनमोहना व आम्ही ठाकर ठाकर या रानाची पाखर, दुसरीच्या विद्यार्थ्यांनी भुमरो भुमरो, तिसरीच्या विद्यार्थ्यांनी घूमर घूमर, चौथीच्या विद्यार्थ्यांनी ओ नाखवा बोटीने फिरवाल का, पाचवीच्या विद्यार्थ्यांनी मलमी मांडा हिरावले, सहावीच्या विद्यार्थ्यांनी काल बेलिया आरारा, सातवीच्या विद्यार्थ्यांनी काठी न घोंगड व ले ले पार्टी, आठवीच्या विद्यार्थ्यांनी आ डोंगरी मारे तसेच अंगात आलया देवा आणि मुलींनी बेटी बचाओ बेटी पाढाओ हे नाटक इत्यादी सादरीकरण केले. पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता व पालकांनी सहकार्यातून शाळेस विविध वस्तू प्रदान केल्या.
नृत्य मार्गदर्शन सँडी सर यांनी केले
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ मनीषा सोमवंशी मॅडम व सौ.सोनाली रणदिवे मॅडम यांनी केले हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शाळेचे अनिता गुंजाळ,शिल्पा बागल, प्रियांका भागवत, अरुणा थोरात ,आशिया खान ,मनीषा कोल्हे , स्वाती वाबळे , मोनिका थोरात ,आशा दाते
, सोनल पारेख, पल्लवी धिमते , आहेर सर , सागर काळे , विशाल गांजाळे
, वैशाली खिलारी , सुनीता पांचाळ, सागर बेंडे , सुषमा कांबळे , अनिकेत सुडके, प्रवीण थोरात इ. कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.
Science Exhibition and wallpaper presentation
Annual Sports Week
Hon Secretary Secondary RSS visit
New Premises
Activities as a part of Celebration
Padmabhushan Dr.Karmveer Bhaurao Patil 135th Birth Anniversary Celebration at GPEMS, Manchar..A Gaint rally in the Vicinity of Manchar NagarPanchayat ....Eye Illuminating yl performance of Dhol, Tasha, Zanj, Tipri, Garba, Varkari Groups of Students....A memorable day