01/10/2023
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना मन की बातच्या माध्यमातून 1 ऑक्टोबर 2023 रोजी स्वच्छतेसाठी एक तास श्रमदान करून गांधीजींना 'स्वच्छांजली' अर्पण करण्याचे आवाहन केले आहे. त्यानुसार #स्वच्छता_हीच_सेवा या उपक्रमाअंतर्गत महाविदयालय परिसरात स्वच्छता मोहीम.....
#स्वच्छांजली
18/09/2023
मेरी माटी मेरा देश
आत्मनिर्भर आणि विकसित राष्टाचे स्वप्न साकारत असताना गुलामगिरीची मानसिकता मुळापासून नष्ट करून,देशाच्या समृद्ध वारशाचा गौरव करत, देशाची एकात्मता बलशाली करून देशाचे नागरिक म्हणून सर्व कर्तव्यांचे पालन करू अशी शपथ घेत मेरी माटी मेरा देश चा जयघोष आसमांतात दूमदुमावा. हा उद्देश समोर ठेवत
आज आमच्या महाविदयालयात मेरी माटी मेरा देश उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाअर्तंगत अमृतकलश पूजन, जैवविविधता व मानवसहजीवन या विषयाला अनुरूप वन्यजीवगणना पुस्तक प्रकाशन तसेच रा.से.यो.च्या फलकाचे अनावरण करण्यात आले. सदर कार्यक्रमासाठी प्रमुख पाहूणे म्हणून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्रकुलगूरू मा.डॉ.पराग काळकर तसेच राष्टीय सेवा योजना राज्य सल्लागार मा.डॉ.राजेश पांडे, सा.फु.पुणे विद्यापीठाचे व्यवस्थापण परिषद सदस्य मा.डॉ.देवीदास वायदंडे तसेच मा.सौ.बागेश्री मंथाळकर, अधिसभा सदस्य मा. श्री.प्रसेन्नजीत फडणवीस, सा. फु. पुणे विद्यापीठाचे २ा. से.यो. संचालक मा.डॉ. सदानंद भोसले, टी.जे. महाविद्यालय खडकीचे प्राचार्य मा.डॉ.संजय चाकणे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.मोहन वामन तसेच प्राचार्य डॉ.रणजीत पाटील उपस्थित होते.
महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या अमृतकलशात सर्वांनी एक मुठ माती टाकुन मेरी माटी मेरा देश अभियानात सहभाग नोंदवला. याप्रसंगी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते 75 घटांमधे बीजारोपण देखील करण्यात आले.
या प्रसंगी मनोगत व्यक्त करत असताना मा. राजेश पांडे यांनी भारत देशाला बलीदान आणि त्यागाचा इतिहास आहे, या इतिहासाकडे गांर्भियाने पाहीले पाहीजे. दिल्लीत निर्माण होणा-या रोपवाटीकेत एक मुठ मातीचे योगदान देवून या दैदिप्यमान इतिहासाचे आपण साक्षीदार होवूयात असे मत व्यक्त केले.
तर प्रकुलगूरू मा.डॉ.पराग काळकर यांनी मनोगत व्यक्त करत असताना महाविद्यालयाच्या विविध उपक्रमांचे कौतूक करत निसर्गाचे मानसाशी असणारे नाती या मातीशी इमान राखून जपले पाहीजे असे मत व्यक्त केले. मेरी माटी मेरा देश या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ.मोहन वामन यांनी केले तर आभार डॉ.मिनल भोसले यांनी मांडले. सदर उपक्रमाचे आयोजन डॉ. डी. वाय. पाटील युनिटेक सोसायटीचे अध्यक्ष आदरणीय डॉ. पी. डी. पाटील साहेब, उपाध्यक्षा आदरणीय डॉ. भाग्यश्रीताई पाटील मॅडम, सचिव मा.डॉ. सोमनाथ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. कार्यक्रम आयोजनात डॉ. मुकेश तिवारी, डॉ. विजय गाडे, प्रा.मंजूषा कोठावदे, प्रा. खालीद शेख, प्रा. सतीश ठाकर,प्रा. रोहीत वरवडकर, प्रा. करिश्मा सय्यद, प्रा. स्वप्नाली बिरनाळे, सौ.मनिषा पवार, महाविद्यालयातील रासेयो सर्व कार्यक्रम अधिकारी तसेच सर्व प्राध्यापक व प्राध्यापक्केतर कर्मचारी यांनी सहभाग नोंदवला.
31/08/2023
Sports day 2023 at college....
26/08/2023
डॉ.डी.वाय. महाविद्यालयात प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी स्वागत समारंभाचे आयोजन
डॉ.डी.वाय. पाटील युनिटेक सोसायटीच्या, डॉ.डी.वाय. पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविदयालय आकुर्डी मधे प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी नुकतेच स्वागत समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.
सदर कार्यक्रमासाठी प्रमुख पाहूणे म्हणून सा. फु. पुणे विद्यापीठाचे आजीवन व अध्ययन विभागाचे संचालक तसेच अर्थशास्त्र विभागाचे विभागप्रमुख मा.डॉ. विलास आढाव व अरविंद तेलंग महाविद्यालय निगडी च्या अर्थशास्त्र विभागाच्या विभागप्रमूख मा.डॉ. संगिता साळवेयांना आंमत्रित करण्यात आले होते..
कार्यक्रम प्रसंगी मनोगत व्यक्त करताना मा.डॉ. संगिता साळवे यांनी महाविदयालयीन उपक्रमांचे कौतूक करत प्रथम वर्षासाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक अभ्यासाबरोबर नैतिक मुल्यांचे शिक्षण देखील विद्यार्थ्यांना आवश्यक आहे असे मत व्यक्त केले. तसेच मा.डॉ. विलास आढाव यांनी मार्गदर्शन करत असताना नवीन शैक्षणिक धोरणाच्या अवलंबना विषयी माहिती दिली..
सदर कार्यक्रमाचे आयोजन डॉ. डी. वाय. पाटील युनिटेक सोसायटीचे अध्यक्ष आदरणीय डॉ. पी. डी. पाटील साहेब, सचिव आदरणीय डॉ. सोमनाथदादा पाटील सर आणि विश्वस्त आदरणीय डॉ. स्मिता जाधव मॅडम, प्राचार्य डाॕ. मोहन वामन यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते.
या कार्यक्रम आयोजनात महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचारी यांनी सहभाग नोंदविला.
07/08/2023
...राष्ट्रीय सेवा योजना पुरस्कार वितरण कार्यक्रमप्रसंगी डाॕ. डी. वाय. पाटील महाविद्यालयाला सहा पुरस्कार..
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे सन 2019-20, 2020-21, 2021-22 या वर्षाच्या पुरस्काराचे वितरण नुकतेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात पार पडले. या पुरस्कार सोहळ्यात डाॕ. डी.वाय. पाटील कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, आकुर्डी, महाविद्यालयास खालील पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले,
१) 2019-20 जिल्हास्तरीय उत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार
२) 2019-20 उत्कृष्ट कार्यक्रम अधिकारी म्हणून डाॕ. मिनल भोसले यांना पुरस्कार
३) 2020-21 चा जिल्हास्तरीय उत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार
४)2020-21 उत्कृष्ट कार्यक्रम अधिकारी म्हणून प्रा. गणेश फुंदे यांना पुरस्कार
५) डॉ.मिनल भोसले यांना 2020-21 साली सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची 'आव्हान' स्पर्धेस टिम घेऊन गेल्याचे योगदान दिल्याचा पुरस्कार
६ ) प्रा. बबलू नवले यांना कोल्हापूरमध्ये आलेल्या पुराच्या वेळी मदतीसाठी रा.से.यो स्वयंसेवकांची टीम घेऊन गेल्याच्या योगदानाबद्दल पुरस्कार
असे सहा पुरस्कार महाविद्यालयास मिळाले. या राष्ट्रीय सेवा योजनेच्या पुरस्कार वितरण समारंभास उपस्थित असलेले सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलसचिव डाॕ. प्रफुल्ल पवार, व्यवस्थापन परिषद सदस्या बागेश्री मंथाळकर, प्राचार्य डाॕ. नितिन घोरपडे, श्री. शिंगणापूरकर, प्राचार्य डाॕ. वायदंडे, श्री. प्रसन्नजित फडणवीस , राष्ट्रीय सेवा योजना संचालक डाॕ. सदानंद भोसले, विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक डाॕ. अभिजीत कुलकर्णी , रा.से.यो. चे माजी संचालक डाॕ. प्रभाकर देसाई यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण करण्यात आले.
या पुरस्कार वितरण समारंभामध्ये प्रारंभी महाविद्यालयाने राष्ट्रीय सेवा योजने अंतर्गत घेण्यात आलेलेल्या जैवविविधता शिबिराच्या माहितीपुस्तिकेचे प्रकाशनही करण्यात आले. या माहितीपुस्तिके बाबत प्राचार्य डाॕ. मोहन वामन यांनी उपस्थितांना माहिती दिली.
सदर पुरस्कार मिळाल्याबद्दल डॉ. डी. वाय. पाटील युनिटेक सोसायटीचे अध्यक्ष आदरणीय डॉ. पी. डी. पाटील साहेब, उपाध्यक्षा आदरणीय डॉ. भाग्यश्रीताई पाटील मॅडम, सचिव आदरणीय डॉ. सोमनाथदादा पाटील आणि विश्वस्त आदरणीय डॉ. स्मिता जाधव मॅडम यांनी महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापक आणि प्राध्यापकेत्तर कर्मचारी यांचे कौतूक केले.
01/08/2023
डाॕ. डी. वाय.पाटील महाविद्यालयाकडून वृक्षारोपण.
आकुर्डी ः डॉ. डी. वाय. पाटील युनिटेक सोसायटीच्या आदरणीय उपाध्यक्षा मा. डॉ. भाग्यश्रीताई पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने डॉ. डी. वाय. पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय आकुर्डी, पुणे आणि डॉ. डी. वाय. पाटील विज्ञान व संगणकशास्त्र महाविद्यालय आकुर्डी, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने मौजे शेलारवाडी येथे वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमांतर्गत कदंब, पारिजातक, कान्हेर, कैलापती अशा १५१ वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले. तसेच राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांच्या श्रमदानातून तयार केलेल्या वनतळ्यांचे जलपूजनही करण्यात आले. यावेळी सर्वांनी जल संवर्धनाचा तसेच निसर्ग संवर्धनाचा संकल्प केला. या उपक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून देहूरोड कटक मंडळाचे माजी उपाध्यक्ष श्री. रघुवीरभाऊ शेलार तसेच श्री. अमित भेगडे, श्री. मनोहर भेगडे श्री. योगेश शेलार श्री. अतुल भेगडे आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.मोहन वामन उपस्थित होते .
या शुभ प्रसंगी बोलताना प्रारंभी संस्थेच्या आदरणीय उपाध्यक्षा मा. डॉ. भाग्यश्रीताई पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी मा. श्री. रघुवीरभाऊ शेलार यांनी महाविद्यालय वेळोवेळी करीत आलेल्या कामांचे कौतुक केले. वृक्ष लागवड व त्याचे संवर्धन करणे तसेच जलसंवर्धन करणे किती महत्वाचे आहे हे बोलताना, त्यांनी महाविद्यालयाने आजपर्यंत केलेले सर्व उपक्रम शाश्वत आहे हे सांगितले. आपल्या सर्व उपक्रमांमुळे जैविक विविधतेच्या संवर्धनासाठी खूप मदत होईल असेही मत व्यक्त केले. प्रारंभी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना प्राचार्य डाॕ. मोहन वामन यांनी महाविद्यालयाने शेलारवाडीच्या परिसरात आतापर्यंत जे उपक्रम घेतले त्यांचा ऊहापोह केला. तसेच आदरणीय डाॕ. भाग्यश्रीताई पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
सदर उपक्रमासाठी डॉ. डी. वाय. पाटील युनिटेक सोसायटीचे अध्यक्ष आदरणीय डॉ. पी. डी. पाटील साहेब, उपाध्यक्षा आदरणीय डॉ. भाग्यश्रीताई पाटील मॅडम, सचिव आदरणीय डॉ. सोमनाथदादा पाटील सर आणि विश्वस्त आदरणीय डॉ. स्मिता जाधव मॅडम यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
उपक्रमाच्या आयोजनात राष्ट्रीय सेवा योजनेचे सर्व कार्यक्रम अधिकारी व महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचारी यांनी सहभाग नोंदवला.
14/07/2023
औषधी वनस्पती माहिती पुस्तिका प्रकाशन कार्यक्रम
१७ फेब्रुवारी २०२३ रोजी डॉ.डी.वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती, मा.डॉ.पी. डी. पाटील साहेबांनी वयाच्या सत्तराव्या वर्षात पर्दापण केले.. आपल्या सर्वांचे आधारवड असणाऱ्या साहेबांच्या ७० व्या वाढदिवसाचे औचित्य साधत सा. फु. पुणे विद्यापीठ नियोजन व विकास विभाग, वन विभाग महाराष्ट्र शासन व आमच्या डॉ.डी.वाय. पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय आकुर्डी यांच्या संयुक्त विद्यमाने नवीन शैक्षणिक धोरणाअंर्तगत मानवी आरोग्यासाठी औषधी वनस्पतींविषयी असलेले भारतीय पारंपारिक ज्ञान या विषयावर आधारित या राष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन दि. १ ते ३ मार्च या कालावधीत इकोसिटी - घाटघर कळसूबाई हरिश्चंद्रगड वन्यजीव अभयारण्य , भंडारदरा ता. अकोले येथे करण्यात आले होते..
अभयारण्यात राहणाऱ्या , जंगलाला आपले घर मानणाऱ्या ठाकर व महादेव कोळी या आदिवासी समाजातील वैदु लोकांकडे असलेले पारंपारिक आयूर्वेदिक ज्ञान संशोधकांपर्यंत पोहचावे व या माहितीचा दस्तावेज तयार व्हावा हा या कार्यशाळेमागील प्रामाणिक हेतू.. या कार्यशाळेत महाराष्टभरातील ९२ वनस्पतीशास्त्रज्ञ तर ३५ वैदु उपस्थित होते. या वैदु लोकांकडून जमा केलेल्या माहितीची एक पुस्तिका महाविद्यालयात तयार करण्यात आली. ही माहिती पुस्तिका मा.डॉ.पी. डी. पाटील साहेब यांच्या हस्ते प्रकाशित व्हावी अशी आमच्या सर्व प्राध्यापकांची इच्छा... आम्ही घातलेल्या सादाला प्रतिसाद देत प्रकाशनासाठी मा. साहेबांनी वेळ दिली. ठरल्याप्रमाणे एका छोटेखानी माहिती पुस्तिका प्रकाशन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. प्रकाशन कार्यक्रम प्रसंगी
मा. डॉ.पी. डी. पाटील साहेब, डॉ.डी.वाय. पाटील विद्यापीठाचे कुलगुरु मा.डॉ. एन.जे.पवार, कुलसचिव मा.डॉ. नरेंद्र कडू सर , महाविदयालयाचे प्राचार्य डॉ.मोहन वामन सर उपस्थित होते. महाविद्यालयातील उपक्रमांचा लेखा- जोखा मांडण्यासाठी प्रा. चेतन सरवदे सरांनी पी.पी.टी चे सादरीकरण केले. त्यानंतर माहिती पुस्तिका प्रकाशन कार्यक्रम पार पडला.माहिती पुस्तिका प्रकाशन कार्यक्रमानंतर मार्गदर्शन करत असताना मा. साहेबांनी आकुर्डी महाविद्यालयाच्या विविध उपक्रमांचे कौतूक केले व या उपक्रमांबरोबरच शैक्षणिक संशोधन तसेच पी.एच.डी पूर्ण करण्यावर प्राध्यापकांनी जास्तीत जास्त भर दयावा असे सुचित केले. कुलगुरू मा.डॉ. एन.जे.पवार सर यांनी देखील उपक्रमांचे कौतूक करत आगामी काळात होणाऱ्या महाविदयालयाच्या नॅक मुल्यांकनासाठी शुभेच्छा दिल्या....
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.मोहन वामन सरांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असताना विद्यार्थी केंद्रबिंदू मानून राबवलेल्या उपक्रमांचे विविध, कार्यशाळांचे, परिषदाचे कौतूक व्हावे,कौतूकाची एक थाप पाठीवर देत कुणीतरी लढ म्हणावे ही आमची इच्छा आज पूर्णत्वाकडे गेली.. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मा. प्राचार्य डॉ.मोहन वामन यांनी केले.
12/12/2022
डाॕ.डी.वाय.पाटील महाविद्यालयात 'विभागीय आविष्कार -२०२२ स्पर्धा' पार पडली.
आकुर्डी ः सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि डाॕ.डी.वाय.पाटील युनिटेक सोसायटीचे, डाॕ.डी.वाय पाटील कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय,आकुर्डी यांच्या संयुक्त विद्यमाने 'आविष्कार- २०२२ विभागीयस्तर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या विभागस्तरीय स्पर्धेत मानव्यविद्याशाखा, भाषा व ललित कला या विभागातून ५०, वाणिज्य, व्यवस्थापन आणि लाॕ विभागातून-४४, सायन्स विभागातून 98, कृषी आणि प्राणिशास्त्र विभागातून- १०७ इत्यादी संशोधन प्रकल्पासह ५०० विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी झाले होते. महाविद्यालयीनस्तरावरील स्पर्धेतून ज्या विद्यार्थ्यांचे नाविण्यपूर्ण संशोधन प्रकल्प होते ते विद्यार्थी या विभागस्तर स्पर्धेत सहभागी झाले होते.
विद्यार्थ्यांच्या नावीन्यपूर्ण कल्पनेला वाव देऊन त्याच्या संशोधनाला एक व्यासपीठ निर्माण करण्याच्या उद्देशाने आविष्कार ही स्पर्धा - २००६ साली महाराष्ट्राचे तत्कालीन महामहिम राज्यपाल श्री. एस.एम. कृष्णा यांच्या संकल्पनेतून सुरू झाली आहे. कोविडचे दोन वर्ष सोडले तर या स्पर्धेचे हे पंधरावे वर्ष आहे. या विभागीय स्पर्धेच्या उद् घाटन समारंभाचे प्रमुख पाहुणे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे आय.क्यु. ए. सी. चे संचालक डाॕ. संजय ढोले हे होते. त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितले की, आविष्कार स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे या वर्षी महाराष्ट्र राज्याचे आविष्कारचे विजेतेपद आपल्या विद्यापीठालाच मिळेल असे मत व्यक्त केले.
प्रारंभी महाविद्यालयाचे प्राचार्य डाॕ. मोहन वामन यांनी आपल्या प्रास्ताविकात आविष्कार स्पर्धेचा हेतू आणि उद्देश सांगितला. आविष्कार स्पर्धेचे महाविद्यालयाचे समन्वयक प्रा. राधाकृष्ण ठाणगे यांनी स्पर्धेचा लेखाजोखा मांडला. या कार्यक्रमाचे दुसरे प्रमुख पाहुणे डाॕ. रणजित पाटील हे होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. चेतन सरवदे यांनी केले तर आभार प्रा. डाॕ. मुकेश तिवारी यांनी मानले.
या विभागीय स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून डाॕ. राम गंभीर, डाॕ. वैभव जाधव, डाॕ. किशोर निकम, डाॕ. प्रशांत साठे, डाॕ. माधव सरोदे, डाॕ. अजित धात्रक, डाॕ. डी. एम. महाजन, डाॕ. रितेश चौधरी, डाॕ. संदीप जाधव, डाॕ. मानसी कृर्तकोटी, डाॕ. उज्ज्वला शिंदे यांनी काम पाहिले.
या स्पर्धेचे आयोजन संस्थेचे अध्यक्ष मा.डॉ.पी. डी. पाटील , उपाध्यक्षा डाॕ. भाग्यश्रीताई पाटील, सचिव मा.डॉ. सोमनाथ दादा पाटील, विश्वस्त डाॕ. स्मिता जाधव मॕडम आणि प्राचार्य डाॕ. मोहन वामन यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. या स्पर्धेच्या आयोजनामध्ये महाविद्यालयाचे विद्यार्थी, प्राध्यापक आणि प्राध्यापकेत्तर कर्मचाऱ्यांनी यांनी सहभाग नोंदविला.
○
12/12/2022
डाॕ. डी.वाय.पाटील कला, वाणिज्य आणि विज्ञान
महाविद्यालय, आकुर्डी, पुणे. मानशास्त्र विभाग
आयोजित
दोन दिवसीय राष्ट्रीय परिषद
बुधवार दि. १४ डिसेंबर व गुरुवार दि. १५ डिसेंबर
'Psychology and Health Disorder'
30/11/2022
NSS special winter camp at shelarwadi
Date - 23/11/2022 to 29/11/2022
महाविदयालयांमधे नोव्हेंबर महिना सुरु झाला की वेध लागतात राष्टीय सेवा योजनेच्या विशेष हिवाळी शिबीरांचे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना विभाग व आमच्या डॉ. डी.वाय. पाटील युनिटेक सोसायटीच्या, डॉ.डी.वाय. पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय आकुर्डी आणि डॉ.डी.वाय. पाटील विज्ञान व संघणकशास्त्र महाविद्यालय आकुर्डी यांच्या संयुक्त विदयामाने राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष हिवाळी शिबीर दिनांक २३ नोव्हेंबर २०२२ ते २९ नोव्हेंबर २०२२ या दरम्यान घोराडेश्वर शेलारवाडी ता. मावळ या ठिकाणी संपन्न झाले.
कोरोनाच्या दोन वर्षाच्या प्रदिर्घ काळानंतर प्रचंड प्रतिसाद व उत्साही वातावरणात शिबीर पार पडले. शेलारवाडी या ठिकाणी मागील पाच वर्षांपासून राष्ट्रीय सेवा योजनेअंर्तंगत महाविद्यालयाने जलसंधारणासाठी तीन वनतळी, २५१चाफा वन निर्मिती, १५१अर्जून वृक्ष वृक्षारोपण, ५१लक्ष्मीतरु वृक्षाचे वृक्षरोपण, १०१ बेल वृक्ष लागवड, अजाण वृक्ष लागवड, वृक्षसंर्वधनाचा जागर व्हावा यासाठी वृक्षदिंडीचे आयोजन घोराडेश्वर या ठिकाणी येणाऱ्या भाविकांसाठी स्वच्छतागृह निर्मिती, लागवड केलेल्या वृक्षांचे संर्वधन व्हावे या दृष्टीने ठिबक सिंचनाची सोय असे विविध पर्यावरण व निसर्गसंवर्धन उपयोगी उपक्रम मा. प्राचार्य डॉ.मोहन वामन यांच्या मार्गदर्शनाखाली राबवले आहेत. या शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मधे राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष हिवाळी शिबीरात घोराडेश्वर या ठिकाणी काही वृक्षांना ठिबक सिंचनाची सोय, झाडांना आळी करणे, डोंगरावरील प्लास्टिक गोळा करणे, झाडांना पाणी देणे, वनतळ्यांच्या परिसाभोवती लावलेल्या वृक्षांना आळी करणे, उपद्रवी वनस्पती ( कॉसमॉस ) उच्चाटन यासारखी वेगवेगळी कामे केली. शिबीरामधे
श्रमदानाना बरोबर विदयार्थ्यांचा सर्वांगिण व व्यक्तीमत्त्व विकास व्हावा या दृष्टीने विविध तज्ञ व्यक्तींच्या मार्गदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते यामधे प्रामुख्याने वनस्पतीशास्त्र अभ्यासक, शास्त्रज्ञ, पर्यावरण तज्ञ मा.डॉ. सचिन पुणेकर, महाविदयालयाचे प्राचार्य व वनस्पतीशास्त्राचे अभ्यासक मा.डॉ.मोहन वामन, सा. फु. पुणे विद्यापीठाच्या नुकत्याच नवनिर्वाचित सिनेट सदस्य मा.सौ. बागेश्री मंथाळकर अशा विविध वक्यांना बोलावण्यात आले होते. शिबीराच्या उद्घाटन प्रसंगी देहूरोड कॅन्टोमेट बोर्डाचे उपाध्यक्ष मा. श्री. रघूवीर शेलार, तसेच श्री.योगेश शेलार, श्री. अमित भेगडे, महाविद्यालयाचे प्राचार्य मा.डॉ. मोहन वामन, विज्ञान विभागाचे प्रमूख मा.डॉ. मुकेश तिवारी, वाणिज्य विभागाचे प्रमूख मा.डॉ. विजय गाडे उपस्थित होते.
या शिबीराचे आयोजन संस्थेचे अध्यक्ष मा.डॉ.पी. डी. पाटील , उपाध्यक्षा डाॕ. भाग्यश्रीताई पाटील, सचिव मा.डॉ. सोमनाथ दादा पाटील, विश्वस्त डाॕ. स्मिता जाधव मॕडम, प्राचार्य डाॕ. मोहन वामन यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते.
शिबीराची पुर्ण जबाबदारी राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. गणेश फुंदे, डॉ.मिनल भोसले,प्रा. खालिद शेख, प्रा. हेमल ढगे, प्रा. सौरभ शिंदे, यांनी पार पाडली.
10/10/2022
आकुर्डीच्या डॉ. डी. वाय. पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात वन्यजीव सप्ताहाचे आयोजन
दिनांक: ३ ऑक्टोबर ते ८ ऑक्टोबर २०२२
डॉ. डी. वाय. पाटील युनिटेक सोसाईटीचे, डॉ. डी. वाय. पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय आकुर्डी, पुणे येथे वन्यजीव सप्ताहाचे आयोजन ३ ऑक्टोबर ते ८ ऑक्टोबर २०२२ केले आहे याप्रसंगी ३ ऑक्टोबर २०२२ रोजी वन्यजीव सप्ताहाच्या उदघाटन सोहळ्याचे आयोजन केले होते. या उदघाटन प्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख अथिति आणि उदघाटक डॉ. अपर्णा कलावते (वैद्यानिक, भारतीय प्राणी सर्वेक्षण, आकुर्डी, पुणे) या उपस्थित होत्या तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मोहन वामन, विज्ञान विभागाचे प्रमुख डॉ. मुकेश तिवारी आणि वन्यजीव सप्ताहाचे आयोजक प्रणीशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख प्रा. सतीश ठाकर व वनस्पतीशास्त्र विभागाच्या विभाग प्रमुख प्रा. अर्चना सुतार उपस्थित होते.
वन्यजीव सप्ताहच्या प्रसंगी महाविद्यालयात विविध स्पर्धांचे आयोजन केले होते ज्यामध्ये पोस्टर प्रेज़ेंटेशन, वक्तृत्व स्पर्धा, निबंध लेखन तसेच प्रश्नमंजुशा, रानभाज्यांचे प्रदर्शन अशा स्पर्धा आयोजित केल्या होत्या.
उद्घाटनाच्या प्रसंगी बोलताना डॉ. अपर्णा कलावते यांनी प्रत्येक छोट्या व मोठ्या वन्यजीवांचे तसेच कीटकांचे आपल्या आयुष्यात असलेले महत्व सांगितले तसेच महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या विविध स्पर्धांबद्दल कौतुक करताना अशा प्रकारच्या स्पर्धांमधून तसेच उपक्रमांमार्फत महाविद्यालयात विद्यार्थ्यांमध्ये वन्यजीव संवर्धनाचे महत्व जाणून देत आहोत त्याबद्दल डॉ. अपर्णा यांनी कृतद्यता व्यक्त केली.
वन्यजीव सप्ताहाच्या अंतर्गत महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी कास पठार येथे शैक्षणिक सहलीचे आयोजन करण्यात आले होते ज्यामध्ये विद्यार्थ्यांना आपल्या राज्यातील काही नामशेष होत चाललेल्या झाडांच्या व प्राण्यांबद्दल माहिती मिळावी हा हेतू होता. या शैक्षणिक सहलीचे आयोजन डॉ. मुकेश तिवारी, प्रा. सतीश ठाकर, प्रा. अर्चना सुतार, प्रा. खालिद शेख, प्रा. हेमल ढगे, प्रा. संध्या पाटील, प्रा. चेतन सरवदे, प्रा. भागवत देशमुख, प्रा. स्नेहल श्रिगडिवार, प्रा. प्रियांका शिवनीकर, प्रा. यशश्री टिळेकर यांनी प्राचार्य डॉ. मोहन वामन यांच्या मार्गदर्शनाखाली केले.
वन्यजीव सप्ताहाच्या समारोप व बक्षीस वितरण सोहळ्यास प्रमुख अतिथि म्हणून प्राचार्य डॉ. संजय चकणे व प्राचार्य डॉ. काकासाहेब मोहिते उपस्थित होते.
प्राचार्य डॉ. मोहन वामन सरांनी सर्व प्रमुख अतिथिंची ओळख करून दिली तसेच सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. प्राचार्य डॉ. काकासाहेब मोहिते सरांनी सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व शुभेच्छा दिल्या.
प्राचार्य डॉ. संजय चकणे सरांनी त्यांचे गडकिल्ले भ्रमंती तसेच जंगल भ्रमंतीचे काही उदाहरण देऊन सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. स्पर्धेतील सर्व विजेत्या विद्यार्थ्यांचे प्रमाणपत्र देऊन सर्व मान्यवरांनी कौतुक केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सतीश ठाकर यांनी तर आभार प्रदर्शन डॉ. मुकेश तिवारी यांनी केले.
या वन्यजीव सप्ताहाचे आयोजन विज्ञान विभागाच्या सर्व प्राध्यापकांनी केले होते.
महाविद्यालयात नेहमीच अशा प्रकारचे नवनवीन कार्यक्रम व उपक्रमांचे आयोजन करण्यासाठी प्रोत्साहन देणारे आणि वेळोवेळी मार्गदर्शन करणारे डॉ. डी. वाय. पाटील युनिटेक सोसाईटीचे अध्यक्ष आदरणीय डॉ. पी. डी. पाटील सर यांनी मार्गदर्शन केले व शुभेच्छा दिल्या तसेच संस्थेचे सचिव आदरणीय डॉ. सोमनाथ पाटील सर आणि महाविद्यालयाच्या विश्वस्त आदरणीय डॉ. स्मिता जाधव पाटील यांनीसुध्दा मार्गदर्शन व शुभेच्छा दिल्या.
05/10/2022
डाॕ.डी.वाय. पाटील महाविद्यालयात पार पडली 'अविष्कार' स्पर्धा.
आकुर्डी ः डाॕ.डी.वाय.पाटील युनिटेक सोसायटीचे, डाॕ.डी.वाय पाटील कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय,आकुर्डी येथे महाविद्यालयस्तरावर अविष्कार स्पर्धा पार पडली. या स्पर्धेचे आयोजन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते.
या स्पर्धेचे उद् घाटन डाॕ. डी. वाय. पाटील युनिटेक सोसायटीचे कार्यकारी संचालक, डाॕ. अविनाश ठाकूर यांच्या हस्ते झाले. मार्गदर्शक परिक्षक म्हणून डाॕ. रामदास गंभीर, डाॕ. मिलिंद सरदेसाई, डाॕ. संजय कप्तान, डाॕ. एस. डी. आघाव, डाॕ. किशोर निकम हे उपस्थित होते. याप्रसंगी बोलताना डाॕ. ठाकूर यांनी या स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी केलेल्या संशोधनाला एक व्यासपीठ मिळाले. तसेच विद्यार्थ्यांच्या संशोधनाचा चालना देण्यासाठी संस्था सर्वोतपरी प्रयत्न करत आहे असे मत त्यांनी व्यक्त केले. तसेच या स्पर्धेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. प्रारंभी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात अविष्कार ही स्पर्धा सुरू करण्यात ज्यांचा मोलाचा वाटा आहे ते महाविद्यालयाचे प्राचार्य डाॕ. मोहन वामन यांनी आजपर्यंतची या स्पर्धेची वाटचाल सांगितली. ते अविष्कारचे चेरमन असताना त्यांनी केलेले अमूलाग्र बदल त्यांनी सांगितले. तसेच या पुढे महाविद्यालयामाध्यमातून विद्यार्थी आणि प्राध्यापक यांच्या संशोधनावर भर दिला जाईल असे मत मांडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. भागवत ढेसले यांनी केले तर आभार डाॕ. मुकेश तिवारी यांनी मानले.या स्पर्धेत सर्व शाखांमधून ८० विद्यार्थ्यांनी आपले ४९ संशोधन प्रोजेक्ट सादर केले. त्यातील परीक्षकांनी २९ प्रोजेक्टची निवड जिल्हास्तर/ विभागस्तर स्पर्धेसाठी केली.
२००६ साली सुरू झालेली 'अविष्कार' ही स्पर्धा, महाविद्यालयीनस्तर, विभागस्तर/जिल्हास्तर, विद्यापीठस्तर, राज्यस्तर अशा अनेक टप्यात ही दरवर्षी स्पर्धा पार पडते. विद्यार्थ्यांमध्ये संशोधकदृष्टी वाढीस लागण्यासाठी व त्यांनी केलेले संशोधनाला एक हक्काचे व्यासपीठ उपलब्ध व्हावे यादृष्टीकोनातून तत्कालीन राज्यापाल यांच्या निर्देशानुसार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने ही स्पर्धा सुरू केली होती.
या कार्यक्रमाचे आयोजन डाॕ. डी. पाटील युनिटेक सोसायटीचे आदरणीय अध्यक्ष डाॕ. पी.डी.पाटील साहेब, उपाध्यक्षा डाॕ. भाग्यश्रीताई पाटील, सचिव डाॕ. सोमनाथदादा पाटील, विश्वस्त डाॕ. स्मिता जाधव मॕडम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या नियोजनात प्रा. राधाकृष्ण ठाणगे, प्रा. चेतन सरवदे, सर्व प्राध्यापक, प्राध्यापकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी यांनी सहभाग नोंदविला.
16/09/2022
परकीय भाषेतून आलेले शब्द कोणत्याही भाषेला समृध्दच बनवतात- डाॕ. शशिकला राॕय
आकुर्डी ः डाॕ.डी.वाय.पाटील युनिटेक सोसायटीचे, डाॕ.डी.वाय पाटील कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय,आकुर्डीच्या हिंदी विभागाकडून १४ सप्टेंबर रोजी झालेल्या हिंदी दिवसाच्या अनुषंगाने हिंदी भाषा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. या सप्ताह अंतर्गत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या हिंदी विभागाच्या प्रोफेसर डाॕ. शशिकला राॕय यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी त्या बोलत होत्या.
हिंदी भाषा सप्ताह अंतर्गत वक्तृत्व, सुलेखन, निबंध, पोस्टर, काव्यवाचन अशा अनेक स्पर्धेचे व डाॕ. शशिकला राय यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांनी हिंदी भाषेचे महत्त्व सांगितले. तसेच परकीय भाषेतून येणारे शब्दांनी भाषा समृध्द होत असते, तसे हिंदी भाषेतही अनेक परकीय भाषेतून शब्द आलेले आहेत. यामुळे भाषेवर फार मोठा परिणाम होतो असे नाही, तर भाषेचाच शब्दसंग्रह वाढून भाषासमृध्दच होते. परकीय भाषेतून हिंदीत आलेले शब्द आज आपल्या एवढे अंगवळनी पडले आहेत की आपण त्यांनाच मूळ हिंदीचेच शब्द मानतो अशा शब्दांची अनेक उदाहरणेही दिली. आपण दुसऱ्याच्या भाषेचा आदर केला तर दुसरा आपल्या भाषेचा आदर करेल असे मत व्यक्त केले.
यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डाॕ. मोहन वामन यांनी पाहुण्याचे स्वागत आणि परिचय करू देताना हिंदी साहित्य आणि संशोधन क्षेत्रातील डाॕ. राॕय यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल सांगितले. तसेच भाषा हे संप्रेषनाचे माध्यम आहे. कोणती भाषा श्रेष्ठ व तुच्छ नसते असे मत व्यक्त केले. प्रारंभी प्रास्तविकात प्रा. राजेश भगत यांनी हिंदी भाषेचे महत्त्व सांगतानाच हिंदी भाषा सप्ताह आयोजनाचा हेतू व उद्देश सांगितला. या सप्ताहनिमित्त आयोजित विविध स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना पारितोषिक देऊन यावेळी गौरवविण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. त्रिवेणी जाधव यांनी केले. तर आभार प्रा.डाॕ. मुकेश तिवारी यांनी मानले.
कार्यक्रमाचे आयोजन डाॕ. डी. पाटील युनिटेक सोसायटीचे आदरणीय अध्यक्ष डाॕ. पी.डी.पाटील साहेब, उपाध्यक्षा डाॕ. भाग्यश्रीताई पाटील, सचिव सोमनाथदादा पाटील, विश्वस्त डाॕ. स्मिता जाधव मॕडम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक प्राध्यापकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
26/08/2022
डाॕ.डी.वाय.पाटील महाविद्यालयाने केले 'अमलताश' वृक्षाचे वृक्षारोपण.
डाॕ.डी.वाय.पाटील युनिटेक सोसायटीचे, डाॕ.डी.वाय पाटील कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, आकुर्डीच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाकडून आज २६ आॕगस्ट डाॕ. डी. पाटील युनिटेक सोसायटीचे आदरणीय सचिव डाॕ. सोमनाथदादा पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्यसाधून वनतळी, घोराडेश्वर येथे १०१ 'अमलाताश' वृक्षाचे वृक्षारोपण करण्यात आले. या उपक्रमात महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व प्राध्यापकेत्तर कर्मचारी सहभागी झाले होते.
'अमलताश' वृक्ष म्हणजेच 'बहावा'. बहावा हा निसर्गाचा सूचक असा वृक्ष आहे. हा बहावा फुलला की दीड महिन्यात पाऊस पडतो. याविषयी वन्यजीव व निसर्ग अभ्यासक मारुती चित्तमपल्ली यांनी आपल्या ग्रंथातदेखील लिहून ठेवले आहे. या भागात यापूर्वीही महाविद्यालयाकडून अजान, कैलासपती,बेल, अर्जुन, कदंब, चाफा, लक्ष्मीतरू, कडूलिंब इत्यादी देशी वृक्षाचे वृक्षारोपण करण्यात आले आहे.
18/08/2022
भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर, देशात सर्वत्र 'स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव' निमित्त 'स्वराज्य सप्ताह' या उपक्रमांतर्गत शासनाच्या परिपत्रकानुसार दि. १७ आॕगस्ट २०२२ रोजी स. ११ वा. डाॕ. डी. वाय. पाटील कला , वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, आकुर्डी येथे 'समूह राष्ट्रगीत गायन' या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी आदरणीय प्राचार्य डाॕ. मोहन वामन , सर्व शाखाप्रमुख, विभागप्रमुख, प्राध्यापक, प्राध्यापकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे काही क्षणचित्रे.
01/08/2022
लक्ष्मीतरु वृक्षाच्या वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन
डॉ. डी. वाय. पाटील युनिटेक सोसायटीच्या आदरणीय उपाध्यक्षा मा. डॉ. भाग्यश्रीताई पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने डॉ. डी. वाय. पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय आकुर्डी, पुणे आणि डॉ. डी. वाय. पाटील विज्ञान व संगणकशास्त्र महाविद्यालय आकुर्डी, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आर्युवेदात औषधी वृक्ष म्हणून नावाजलेल्या ६१ लक्ष्मीतरू वृक्षांचे वृक्षारोपण तसेच राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांच्या श्रमदानातून तयार केलेल्या वनतळ्यांचे जलपुजन करण्यात आले. यावेळी सर्वांनी जल संवर्धनाचा तसेच
निसर्गसंर्वधनाचा संकल्प केला. या उपक्रमासाठी प्रमुख पाहूणे म्हणून देहूरोड छावणी चे उपाध्यक्ष श्री. रघुवीरभाऊ शेलार तसेच श्री. बाळासाहेब शेलार महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.मोहन वामन उपस्थित होते .
या शुभ प्रसंगी बोलताना कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी मा. श्री. रघुवीरभाऊ शेलार यांनी महाविद्यालय वेळोवेळी करीत आलेल्या कामांचे कौतुक केले आणि पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. वृक्ष लागवड व त्याचे संवर्धन करणे तसेच जलसंवर्धन करणे किती महत्वाचे आहे हे बोलताना त्यांनी महाविद्यालयाने आजपर्यंत केलेले सर्व उपक्रम शाश्वत आहे हे सांगितले व आपल्या सर्व उपक्रमांमुळे जैविक विविधतेच्या संवर्धनासाठी खुप मदत होईल असेही नमुद केले. संस्थेच्या आदरणीय उपाध्यक्षा मा. डॉ. भाग्यश्रीताई पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या व महाविद्यालयाला पुढील उपक्रमांसाठी शुभेच्छा दिल्या.
सदर उपक्रमासाठी डॉ. डी. वाय. पाटील युनिटेक सोसायटीचे अध्यक्ष आदरणीय डॉ. पी. डी. पाटील साहेब, उपाध्यक्षा आदरणीय डॉ. भाग्यश्रीताई पाटील मॅडम, सेक्रेटरी आदरणीय डॉ. सोमनाथदादा पाटील सर आणि विश्वस्त आदरणीय डॉ. स्मिता जाधव मॅडम यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
लक्ष्मीतरू वृक्षाचे वृक्षारोपण व जलपुजन या उपक्रमाचे आयोजन आणि नियोजन महाविद्यालयाच्या सर्व प्राध्यापक व प्राध्यापकेत्तर कर्मचाऱ्यांनी प्राचार्य डॉ. मोहन वामन यांच्या मार्गदर्शनाखाली केले.
या उपक्रमात महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचारी यांनी सहभाग नोंदवला.
04/06/2022
World Environment day...
जागतिक पर्यावरण दिन
उपवनसंरक्षक पुणे, वनविभाग मावळ व डॉ.डी.वाय. पाटील युनिटेक सोसायटीच्या, डॉ.डी.वाय. पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय आकुर्डी राष्टीय सेवा योजना व भूगोल विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून दिनांक ४ व ५ जानेवारी २०२२ रोजी स्वच्छ टेकडी, बीजारोपण, वृक्षसंवर्धन अभियानाचे आयोजन घोराडेश्वर डोंगर , शेलारवाडी मावळ या ठिकाणी करण्यात आले.. घोराडेश्वर डोंगर या ठिकाणी असंख्य पर्यटक येतात. या पर्यटकांकडून मोठया प्रमाणावर प्लॅस्टीक कचरा येथे होतो.. वनविभाग मावळ यांच्या सहकार्याने घोराडेश्वर टेकडीवर प्लॅस्टीक गोळा करुन स्वच्छता करण्यात आली. जून महिन्यात मृग नक्षत्राच्या आगमना आधी पर्जन्यवृक्षाच्या बीजांचे बीजरोपण देखील या प्रसंगी करण्यात आले. मागील चार वर्षापासून याच ठिकाणी लावलेल्या अजाण वृक्ष, कंदब, बेल, औषधी वनस्पती, चाफा यांच्या वृक्षांना आळी करुन पाणी घालण्यात आले.. सर्व कार्यक्रमांचे आयोजन अध्यक्ष मा. डाॅ. पी. डी. पाटील साहेब , संस्थेचे सेक्रेटरी मा डॉ. सोमनाथ दादा पाटील , उपाध्यक्ष मा.डॉ. भाग्यश्री ताई पाटील, विश्वस्त मा.डॉ. स्मिता जाधव महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. मोहन वामन यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले तर आयोजनात राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. गणेश फुंदे, प्रा.डॉ. मिनल भोसले, प्रा. खालीद शेख, प्रा. हेमल ढगे, विदयार्थी विकास अधिकारी डॉ. मुकेश तिवारी, डॉ. विजय गाडे, प्रा.राधाकृष्ण ठाणगे, प्रा.सौरभ शिंदे , प्रा. जितेंद्र कमले यांनी सहभाग नोंदवला.
28/05/2022
visit Vigyan Aashram pabal for purpose of MOU......
16/03/2022
युवक युवती उन्नयनीकरण कार्यशाळा...
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना व डॉ.डी.वाय. पाटील कला वाणिज्य व विज्ञान महाविदयालय आकुर्डी महाविदयालय यांच्या संयुक्त विद्यामाने दिनांक १५ मार्च व . १६ मार्च २०२२ २ोजी दोन दिवशीय युवक युवती उन्नयनीकरण कार्यशाळाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळे अंतर्गत स्त्री - पुरुष समानता या विषयावर चर्चा करण्यात आले..
दिनांक १५ मार्च २०२२
कार्यशाळेच्या पहिल्या सत्रात मार्गदर्शन करण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आजीवन अध्ययन व विस्तार विभागाचे संचालक मा.डॉ. धनंजय लोखंडे तसेच मा. प्रा. शैलेजा सांगळे मॅडम यांना आंमत्रित करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.मोहन वामन होते.स्त्री - पुरुष समानता या विषयांवर मार्गदर्शन करत असताना मा.डॉ. लोखंडे सर यांनी इतिहासापासून आजपर्यंतच्या काळावर प्रकाश टाकत स्त्री - पुरुष समानता का गरजेची आहे हे उपस्थित विदयार्थ्यांना सांगितले... तर मा. शैलेजा सांगळे मॅडम यांनी स्त्री सबलीकरणावर विदयार्थ्यांशी संवाद साधला...
दिनांक १६ मार्च २०२२
युवक युवती उन्नयनीकरण कार्यशाळेच्या दुसऱ्या सत्रात मार्गदर्शनासाठी सावित्रीबाई फुले पुणे विदयापीठाचे मानववंशशास्त्र विभागाचे माजी विभागप्रमुख मा.डॉ. राम गंभीर तसेच सावित्रीबाई फुले पुणे विदयापीठाच्या अधिसभा सदस्या मा.सौ. बागेश्री मंथाळकर यांना
आंमत्रित करण्यात आले...
लिंग समभाव या विषयावर अगदी स्पष्टपणे ठाम मत मांडत मा.बागेश्री मंथाळकर यांनी स्त्री - पुरुष समानता हा विषय देखील खेळीमेळीच्या वातावरणात हाताळला..
कार्यक्रमाचे आयोजन संस्थेचे अध्यक्ष मा.डॉ.पी. डी. पाटील सर, उपाध्यक्ष मा.डॉ. भाग्यश्री ताई पाटील, सचिव मा.डॉ. सोमनाथ दादा पाटील, विश्वस्त स्मिता जाधव मॕडम, प्राचार्य डाॕ. मोहन वामन यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या आयोजनात प्रा.डॉ. विजय गाडे, प्रा. ज्योती ढोबळे, प्रा.भार्गवी कुलकर्णी, प्रा.सौरभ शिंदे, प्रा. रोहीत वरवडकर, तसेच राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. गणेश फुंदे,प्रा. डाॕ. मिनल भोसले, प्रा. खलिद शेख, प्रा. हेमल ढगे यांनी सहभाग नोंदवला.