21/09/2022
लिपिक भरतीबाबत महत्वाचा निर्णय
महाराष्ट्र शासनाच्या मंत्रिमंडळाचा नव्याने जाहीर झाला. यापुढे वर्ग - ३ म्हणजे लिपिक भरती ही MPSC आयोगातर्फे भरली जाणार आहेत.
MPSC च्या मुख्य परीक्षेपूर्वी लिपिक परीक्षार्थींना स्वतः COMPUTER TYPING परीक्षा या Computer वरच द्यावा लागणार आहेत.
म्हणून विद्यार्थी-विद्यार्थीनींनी आमिष दाखवून जादा रुपये मोजून बोगस प्रमाणपत्र मिळवून MPSC परीक्षेतील संधी स्वतःहून गमावू नकात.
चला तर मग आजच आपल्या शहरातील अधिकृत शासनमान्य टाईपरायटिंग इन्स्टिट्यूट मध्ये प्रवेश घ्या आणि भविष्यात होणारे नुकसान टाळा.
आपल्या शहरातील महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांची अधिकृत शासनमान्य कॉम्प्युटर-टायपिंग इन्स्टिट्यूट कोणती आहे हे पाहण्यासाठी खालील Link वर भेट द्या, खात्री करा आणि प्रवेश घ्या!
http://www.mscepune.in/gcc/CT_INST_MUMBAI.aspx
जानेवारी २०२३ मध्ये होणाऱ्या कॉम्प्युटर-टायपिंग परीक्षेकरिता प्रवेश सुरु.
21/09/2022
लिपिक भरतीबाबत महत्वाचा निर्णय
महाराष्ट्र शासनाच्या मंत्रिमंडळाचा नव्याने जाहीर झाला. यापुढे वर्ग - ३ म्हणजे लिपिक भरती ही MPSC आयोगातर्फे भरली जाणार आहेत.
MPSC च्या मुख्य परीक्षेपूर्वी लिपिक परीक्षार्थींना स्वतः COMPUTER TYPING परीक्षा या Computer वरच द्यावा लागणार आहेत.
म्हणून विद्यार्थी-विद्यार्थीनींनी आमिष दाखवून जादा रुपये मोजून बोगस प्रमाणपत्र मिळवून MPSC परीक्षेतील संधी स्वतःहून गमावू नकात.
चला तर मग आजच आपल्या शहरातील अधिकृत शासनमान्य टाईपरायटिंग इन्स्टिट्यूट मध्ये प्रवेश घ्या आणि भविष्यात होणारे नुकसान टाळा.
आपल्या शहरातील महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांची अधिकृत शासनमान्य कॉम्प्युटर-टायपिंग इन्स्टिट्यूट कोणती आहे हे पाहण्यासाठी खालील Link वर भेट द्या, खात्री करा आणि प्रवेश घ्या!
http://www.mscepune.in/gcc/CT_INST_MUMBAI.aspx
जानेवारी २०२३ मध्ये होणाऱ्या कॉम्प्युटर-टायपिंग परीक्षेकरिता प्रवेश सुरु.
17/03/2022
स्टेनोग्राफी म्हणजे काय?
स्टेनोग्राफी किंवा शॉर्टहॅंड ही एक प्रकारची लिहिण्याची पद्धत आहे. सांकेतिक अक्षरांच्या आधारे ही कला आत्मसात केली जाते. ज्यामध्ये सामान्य लिखाणाच्या वेगापेक्षा अधिक जलद गतीने लिहिता येणे हे येथे अपेक्षित असते.
ही भाषा सामान्य शब्द अधिक वेगाने लिहिता यावे यासाठी वापरण्यात येते. शॉर्टहॅंड, आशुलिपी, श्रुतलेखन आणि स्टेनो या तिन्ही एकाच प्रकारच्या गोष्टी असून अशा प्रकारची कला ज्यांनी प्राप्त केली आहे, त्यांना स्टेनोग्राफर असे म्हटले जाते. हिंदीमध्ये याला शीघ्रलेखन, श्रुतलेखन अथवा त्वरालेखन असे म्हटले जाते.
स्टेनोग्राफरवर एखाद्या कार्यालयातील अथवा संस्थेतील गोपनीय माहिती सांभाळून ठेवण्याची जबाबदारी असते. त्यामुळे या पदावर काम करणे हे अतिशय महत्त्वाचे, अभिमानाचे, तितकेच आव्हानात्मक व मानाचे काम असते. सध्या संगणकाच्या वाढत्या वापरामुळे स्टेनोग्राफरचे काम अधिक सोपे झाले आहे.
संधी – जवळपास सर्वच सरकारी आणि खासगी क्षेत्रामध्ये स्टेनोग्राफरची आवश्यकता असते. त्यामुळे अनेक कार्यालये या पदाच्या भरतीसाठी जाहिरात काढत असतात. रोजगाराच्या दृष्टीने पाहिले गेल्यास या क्षेत्रात अनेक संधी असून एसएससी, बॅंकिंग, नगर पालिका, न्यायालय आदी ठिकाणी स्टेनोग्राफर्सला मागणी आहे. त्याशिवाय सरकारकडून वेळोवेळी मंत्रालयात कामासाठी जाहिरात प्रसिद्ध केली जाते. एसएससीद्वारे स्टेनोग्राफर (ग्रेड सी, डी) या पदांसाठी भरती करण्यात येते.
स्टेनोग्राफरची मागणी आहे, पण उमेदवार नाहीत
कॉम्प्युटर आल्याने स्टेनोग्राफरचे महत्व संपले असल्याचा अपप्रचार या विषयीचे साधे ज्ञानही नाही अशांनी पसरवले. त्यामुळे हा कोर्स आजही काही जणांना माहिती नाही. परंतु आजही व काही वर्षांपूर्वी स्टाफ सिलेक्शन कमिशन
या संस्थेला 5000 स्टेनोग्राफर हवे होते. मात्र संपूर्ण देशातून 1500 स्टेनोग्राफर मिळू शकले नाहीत. हे फक्त एका विभागाचे झाले, केंद्रीय व प्रत्येक राज्यातील विविध सरकारी संस्था, बॅंका, महानगरपालिका व खाजगी संस्था यांचा विचार केला तर अजून किती पदे शिल्लक असतील.
भारतीय रेल्वेच्या मुंबई व इतर काही भागात या पदासाठी उमेदवार मिळत नाहीत म्हणून रिटायर्ड लोकांना पुन्हा कामावर बोलावण्यात आले होते.
आम्ही म्हणतो नोकर्या नाहीत. अशा पध्दतीने उमेदवार मिळाले नाहीत की मग कालांतराने त्या जागा काही ठिकाणी न भरता ठेवल्या जातात तर काही ठिकाणी रद्दही होतात. दोष कुणाचा?
वयाची मर्यादा
सरकारी आस्थापनांमध्ये स्टेनोग्राफर या पदावर काम करण्यासाठी इच्छुक उमेदवाराचे वय हे कमीतकमी 18 आणि जास्तीत जास्त 27 वर्ष तर काही विभागांमध्ये हे वय 35 वर्षे इतके असू शकते. परंतु अनेक ठिकाणी चांगले स्टेनाग्राफर मिळत नसल्यामुळे वयोमर्यादा वाढविण्यातही येत असल्याचे दिसून येते. सोबत जोडलेल्या महाराष्ट्र राज्याच्या कृषी विभागाच्या जाहिरातीतही हेच दिसून येत आहे. हीच परिस्थिती केंद्र व राज्य सरकारच्या अन्य विभागांमध्ये आहे.
पात्रता
स्टेनोग्राफी क्षेत्रामध्ये करिअर करण्यासाठी उमेदवाराने कमीतकमी बारावीची परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसे पाहिले तर शिकतांना तुम्ही दहावी पास असला तरी चालेल..काही संस्था या पदवीधारकांना प्राधान्य देतात. महाराष्ट्र राज्यातील कार्यालयांमध्ये मराठी अथवा इंग्रजी स्टेनोग्राफर या पदावर काम करण्यासाठी मराठी आणि इंग्रजी टायपिंगचे शासनाने ठरवून दिलेल्या मान्यताप्राप्त संस्थेचे अधिकृत प्रमाणपत्र आवश्यक आहे. मराठी भाषेतील टायपिंगसाठी कमीतकमी 40 शब्द प्रति मिनिट तर इंग्रजीमध्ये प्रतिमिनिट 50 किंवा 60 शब्द प्रति मिनिटचे मान्यताप्राप्त संस्थेचे प्रमाणपत्र आवश्यक आहे. राज्य सरकारच्या एखाद्या विभागात नोकरी करण्याची इच्छा असेल तर त्यासाठी स्टेनोग्राफरचे मान्यताप्राप्त संस्थेतून घेतलेले सर्टिफिकेट आणि टायपिंगचे शासन मान्यताप्राप्त जीसीसी किंवा जीसीसी टीबीसी हे परीक्षा परिषद पुणे यांचे सर्टफिकेट गरजेचे आहे.
केंद्र सरकारच्या अधिपत्याखालील कार्यालयात काम करायचे असल्यास इंग्रजी व हिंदीला प्राधान्य दिले जाते.
सरकारी वेतन
इतर कोर्सच्या मानाने स्टेनोग्राफी शिकण्यासाठी कमी खर्च येतो. सरकारी कार्यालयांमध्ये या क्षेत्रामध्ये उमेदवार हा द्वितीय श्रेणीच्या पदावर काम करतो. त्यामुळे सरकारी नियमांनुसार या श्रेणीला देण्यात येणारे वेतन उमेदवाराला लागू होते.
उच्चश्रेणी लघुलेखक/Higher Grade Stenographer गट ब – १,३२,३००/-
निम्नश्रेणी लघुलेखक/ Lower Grade Stenographer गट ब – १,२२,८००/-
कृषि व पद्म विभाग यांच्या दि. १६/०९/२०२१ च्या जाहिरातीमध्ये हा पगार नमुद केलेला आहे.
स्टेनोग्राफर मिळत नसल्याने वयोमर्यादा देखील वाढविण्यात आल्याचे या जाहिरातीत दिसून येईल.
उच्च /निम्नश्रेणी लघुलेखक पदासाठी ६४ वर्षापर्यंतची वयोमर्यादा आहे.
याचाच अर्थ स्टेनोग्राफर यांचा किती तुटवडा आहे, हे लक्षात घ्या. हिच परिस्थिती शासनाच्या इतर विभागांमध्येही आहे. त्यामुळे भरकटण्यापेक्षा इमानदारीत दोन ते अडीच वर्षात चांगल्या प्रकारे लघुलेखन/SHORTHAND शिकून तुम्हीसुद्धा चांगल्या पगाराची नोकरी प्राप्त करू शकता.
हा कोर्स कुठे शिकवला जातो?
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांची मान्यता असलेल्या अधिकृत व मान्यताप्राप्त संस्थांमध्ये स्टेनोग्राफी कोर्स शिकवला जातो. ज्याचा कालावधी 24 महिने इतका आहे, पहिली परीक्षा देण्यासाठी साधारणत: १ वर्ष लागू शकते, ज्यामध्ये तुम्ही ६० शब्दगतीची परीक्षा देऊ शकता. त्यानंतरच्या ८०,१०० व १२० या तीन परीक्षा तुम्ही प्रत्येक सहा महिन्यानंतर होणाऱ्या परीक्षेला बसून देऊ शकता. हे सर्व विद्यार्थ्यांच्या शिकण्यावरही अवलंबून आहे, याचा विसर पडणार नाही, याची नोंद असावी.
हे गुण असणे महत्त्वाचे
टायपिंगचा वेग वाढविण्यासाठी तुम्हाला अधिक परिश्रम घेणे गरजेचे आहे. सामान्य बोलीभाषेत वापरण्यात येणाऱ्या शब्दांवर विशेष लक्ष असणे आवश्यक. अधिक वाक्यांचा प्रयोग करण्याचा प्रयत्न करणे.सामान्यज्ञान असणे आवश्यक.
दिवसातून कमीतकमी तीन तास तरी अभ्यास गरजेचा.छोट्या शब्दांचा वापर करता येणे गरजेचे. स्वतःचे लक्ष्य निश्चित करा आणि त्यानुसार कामाची आखणी करा.
अधिक माहितीसाठी संपर्क
शारदा शॉर्टहँड, टायपिंग व कॉम्प्युटर इंन्स्टिट्युट-खारघर
सेक्टर १२ खारघर, नवी मुंबई.
संपर्क क्र.
9987999257
9867111481